स्त्रीला समाजाचा आरसा म्हणतात ते खरच . . .
आजच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन जागतील सर्वेच क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करतात. हे तर प्रत्येकालाच माहिती आहे.
असे म्हणतात की,
सशक्त नारी से ही
बनेगा सशक्त समाज
पूर्वीच्या काळी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता, पूर्वी पुरुष प्रधान संस्कृती मानली जायची, त्यावेळी महिलांना फक्त चुल आणि मुलच साभांळाव, अशी समाजातील लोकांची भावना होती.
हेच सर्व थोर का्रंतीकारक समाजसुधारक महात्मा फुले यांच्या लक्षात आले आणि त्यांची अशी इच्छा होती की, प्रत्येक घराघरातील (मुलगी) स्त्री ही शिक्षांत झाली पाहिजे आणि त्यांनी प्रथम आपल्या पत्नीचा म्हणजे सावित्रीबाईला प्रथम शिक्षीत झाल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्याची (क्रांतीची जोत) लावण्यास सुरुवात केली आणि सावित्रीबाईची त्यांच्या ज्ञानाची जोत लावल्याने हळूहळू स्त्री (मुलगी) ही / हया शिक्षीत होऊ लागल्या.
सावित्रीबाईंनी पहिल्या मुलींची शाळा 10 मार्च इ.स. 1897 मध्ये पुणे येथील भिडे वाडयात सुरू केली. हळूहळूही त्या शाळेला प्रतिसाद मुली देत गेल्या.
सावित्री बाईंनी प्रत्येक स्त्री शिक्षीत व्हावी म्हणून समाजाचा खूप त्रास सहन केला, पण त्या समाजातील कोणत्याही समाजिक परिस्थितीला न कंटाळून त्यांचे ते शिक्षणाचे ज्ञानाची जोत लावण्याचे काम अविरतपणे चालूच ठेवले. भरतातील पहिली महिला शिक्षीका त्या सावित्रीबाई फुलेच झाल्या
हे खरच . . .
एकोंविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रीयांना दुय्यम दर्जाचीच वागणूक दिली जात असे, उपभोग आणि कष्ठ याचे साधन म्हणजे स्त्री, असा समाज सर्वसाधारणपणे रुढ झाला होता.
म्हणूनच समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार तसेच शिक्षण किंवा मसदार यासारख्या अधिकारांपासून स्त्रींया क्वचितच होत्या. मात्र, एकोंविसाव्या शतकाच्या मध्यानंतर आपल्यावर होणारा अन्याय आपले हक्क याबाबत स्त्रीयांमध्ये जागृती झाली आणि त्याच्यामध्ये सजगता येऊ लागली आणि यामधूनच स्त्री वादाचा जन्म झाला. मला वाटते की, मुळात नौकरीसाठी स्वइच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रीयांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषयमता खटकू लागली.
पुरुषाइंतकेच काम करुनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संख्याही उपलब्ध नव्हती. मग आपल्या हक्कबाबत स्त्रीया जागृत होऊ लागल्या.
स्त्रीयांचे आत्मधान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले, त्यातल्या काही स्त्रियांना त्यांच्या योगदानाबददल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.
अजून एक सांगायचे म्हटले तर . . .
फोर्ब्सने जगातील 100 सर्वांत शक्तीशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, शॉ एचसीएस मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नादर मल्होत्रा आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मजमदार या जगातील 100 सामर्थवान महिलांमध्ये समावेश आहे.
जर्मानीचे चायलर अँजेला मर्केल सलग 10 व्या वर्षी या सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे. 17 व्या वार्षिक प्रोर्ब पॉवर लिस्टमध्ये 30 देशातील महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार या यादीत अध्यक्षपदी 10 महिला, 38 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 5 कालाकांराचा समावेश त्यांचे वय राष्ट्रीयत्व आणि व्यवसाय वेगळे असले तरीही या महिला ऐकमेकांशी अशी प्रकारे जोडल्या गेल्या आहेत की, त्यांनी 2020 च्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांच्या व्यासपीठाचा सर्वोत्कृष्ठ वापर केला, सांगायाचे म्हणजे आपल्या देशाच्या (भारताच्या) अर्थमंत्री निर्मला सितारमन 41 व्या स्थानावर आहे.
मला वाटते. . . पुरुषांनाही महिलांचे महत्व कळू लागले आहे. भारतीय महिलांनी अल्पावधीतच हे सिध्द केेले आहे की, भारतातील महिला शिक्षण बुध्दिमत्ता, सौंदर्य आणि शौर्यामध्ये जगातील कोणत्याही जातीच्या किंवा देशातील महिलांपेक्षा कमी नाहीत, महिलांच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली आहे, हे बरोबर आहे पण हा विकास अजून पूर्ण म्हणता येणार नाही.
जगातील महिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लख्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवसा “जागतिक महिला दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्युयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
8 मार्चचा इतिहास
संपूर्ण अमेरिका आणि युरोपरहीत जवळजवळ संपूर्ण जगभरात स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष समानतेची हे एक ढळढळीत उदाहरण या अन्यायाविरुध्द स्त्रीया आपापल्या परीने प्रयत्न करीत होत्या, 1890 मध्ये अमेरिकेत सफ्रेजिस्ट असोसिएशन स्थापन झाली.
परंतु ही असोशिएशन सुध्दा वर्णद्वेषी आणि स्थालांतरीतांविषयी पूर्वग्रही असणारी होती, दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून वाचविण्याकरीता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवायचाच हवा, अशाप्रकारचे अवाहन त्या करीत होत्या.
अर्थात या मर्यादीत हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशातील (देशांतरीत) कामगार स्त्रीयांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतीकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये कचोरा झेरकीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रीयांचे वर्तव्य आहे. अशी घोषणा केली, 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शन केली.
दहा तासांचा दिवस आणि कामगारांच्या कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या, या दोन मागण्या बरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनरीपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा, अशी मागणी डोळसपणे केली.
अमेरिकन कामगार स्त्रीयांच्या या व्यापक कृतीने क्लोरा झेटकीन अलीशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या एैतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दीन म्हणून स्विकारावा असा ठराव फलाराने मांडला, तो पास झाला.
यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहीम उघडल्या गेल्या, त्याचा परिणाम म्हणून 1998 साली इंग्लडमध्ये व 1999 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
महिलांचे हक्क आणि लिंग समानता याबददल समाजामध्ये जागरुकता वाढवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे.


