प्रतिनिधी | बदनापूर
छत्रपती संभाजीनगर -जालना महामार्ग रस्त्यावर बदनापूर पोलीस ठाण्यासमोर बसच्या पाठी मागच्या चाकाखाली मोटारसायकलस्वार येऊन जागीच दुर्दैवी अंत झाल्याची घटना सकाळी ९ वाजेव दरम्यान घडली असून अपघाताच्या ठिकाणाची स्थिती बघून नागरिकांनी अक्षरशः काही क्षण डोळे मिटून घेतले होते,अपघातात मृत्यू पावलेली व्यक्ती राखी बांधण्यासाठी आपल्या बहिणीकडे जात असताना सदर अपघात झाला असून संजय सुदंराव चंदनपाट वय ४८ असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या मार्गावर रस्त्याच्या दुतरफा हातगाड्या,रिक्षे व इतर वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण होऊन अपघात घडत असून याच ठिकाणी सेम अपघात काही महिन्यापूर्वी घडला होता.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जडगाव येथील संजय सुदंराव चंदनपाट वय ४८ हे सोमवारी सकाळी मोटारसायकल क्रमांक एम.एच २० जि टी २६७४ ने जालना तालुक्यातील काळेगाव येथे राहत असलेल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात असतांना छत्रपती संभाजीनगर जालना मार्गावर बदनापूर पोलीस ठाण्याजवळ बस क्रमांक एम एच १४-एम एच १६७९ ची धडक मोटारसायकल ला बसली व धडकेमुळे संजय चंदनपाट मागच्या चाकाखाली फेल जाऊन मेंदू चेंडा मेंढा झाल्याने त्यांचा जागीच मुर्त्यू झाला .घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला परंतु अपघात बघून अनेकांनी काही क्षण डोळे मिटून घेतले ,घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मछिंद्र सुरवसे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब जऱ्हाड यांनी धाव घेऊन तात्काळ प्रेतावर कापड झाकून बस बाजूला घेतली. सदर अपघात महामार्ग रस्त्यावर झाल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे अविनाश राठोड व त्यांच्या सहकार्यांनी दुसऱ्या बाजूने वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला व एका खासगी व्हॅनद्वारे प्रेत शासकीय रुग्णालयात पाठवि









