उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीद-शृंगार परिसरानंतर आता ताजमहालाचे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठात याचिका दाखल करून दावा करण्यात आला की, आग्र्याच्या ताजमहालात भगवान शंकराचे मंदिर आहे.
ताजमहालाच्या वरच्या आणि खालच्या भागात २२ खोल्या आहेत, ज्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. यापैकी २० खोल्या उघडण्याची याचिकेत मागणी करण्यात आली असून यात मूर्तींसह इतर पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय सरकारला या तथ्यांची पडताळणी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. अयोध्येतील रहिवासी रजनीशकुमार सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. शिवमंदिरातील मूर्ती आणि शिलालेख व हे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावे ताजमहालातच आहेत. त्यांनी कोर्टाकडे हे पुरावे शोधण्याबाबत निर्देश देण्याची मागणीही केली. त्यांनी एएसआयकडे ताजमहाल परिसरातील बंद खोल्यांची दारे उघडण्याची मागणी केली आहे.



