बदनापूर/ प्रतिनिधी
औरंगाबाद जालना महामार्ग रस्त्यावर बदनापूर महानुभाव आश्रम जवळ एका मोटरसायकल स्वारास पाठीमागून आलेल्या मोटरसायक चालकांनी आडवी लावून मारहाण करीत डोळ्यात मिरची पावडर टाकून ९० हजाराची रक्कल पळविली असून सदर घटना ९ मे रोजी भरदिवसा दुपारी २;३० ते २;४५ दरम्यान घडली आहे.सदर घटनेमुळे नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
औरंगाबाद -जालना महामार्ग रस्त्यावरील बदनापूर प्राईम पेट्रोल पंपाची रक्कम बँकेत भरण्यासाठी पाथ्रीकर शाळेचे कर्मचारी रवींद्र पाटील हे ९ मे रोजी दुपारी २:३० वाजता पेट्रोल पॅम्पवरून बदनापूर कडे निघाले व २:४० वाजेदरम्यान बदनापूर महानुभाव आश्रम जवळ पोहचले असता पे ठिमागून एक मोटारसायकल वर अज्ञात दोन जण आले व त्यांनी पाटील यांच्या मोटारसायकल आडवी करून थेट डोळ्यात मिरची पावडर फेकले व तेव्हड्यात पुन्हा एका मोटारसायकल वर दोन जण आले व त्यांनी हातातील दानूड्क्याने पाटील यांच्या दंडावर व पाठीत मारीत खाली पाडले तदनंतर त्यांनी पाटील यांच्या गळ्यात असलेली बॅग घेऊन पुन्हा आल्यामार्गी पळ काढला सदर बॅग मध्ये ९० हजार व आर ती जी एस साठी असलेला धनादेश व इतर कागदपत्रे होती.
सदर घटना घडल्यानंतर रवींद्र पाटील यांनी प्राईम पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली व पोलीस स्टेशन गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितलं असता बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहीन केली तसेच पेट्रोल पंपावरील सी सी टीव्ही फुटेज तपासले असून फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.






