• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home आपला जिल्हा

पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण

गावमत by गावमत
October 18, 2026
in आपला जिल्हा
0
पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
0
SHARES
213
VIEWS

प्रतिनिधी | बदनापूर

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसमध्ये आयोजित ‘जलसा रास दांडिया २०२६’ हा महोत्सव अत्यंत उत्साही आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला. नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी दांडिया व गरब्याचा मनमुराद आनंद लुटला. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कल्पकतेला आणि त्यांच्या डिजिटल माध्यमांतील कौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने या विशेष रील स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘जलसा रास दांडिया २०२६’ या संकल्पनेवर आधारित एकापेक्षा एक नावीन्यपूर्ण आणि आकर्षक रील्स तयार केल्या होत्या. यामध्ये तरुणाईचा जल्लोष आणि आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा याचे सुरेख प्रतिबिंब उमटले. पाथ्रीकर कॅम्पसच्या विशाल क्रीडांगणावर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संगीत आणि दांडियाच्या तालावर संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होताया सोहळ्याला संस्थेचे संस्थापक डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, सचिव डॉ. एम. डी. पाथ्रीकर, ट्रस्टी डॉ. एस. एस. शेख, डॉ. खान नाजमा, डॉ. सोनाली अग्रवाल, डॉ. प्रज्ञा सानप आणि इंजि. सोहा शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यांच्यात सांघिक भावना आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. शेख एस. एफ. यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका निशिगंधा देशमुख यांनी मानले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी पाथ्रीकर कॅम्पसमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला दोन हजार रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला पंधराशे रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला एक हजार रुपये असे पारितोषिक देण्यात आले. संस्थेचे संस्थापक डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, सचिव डॉ. एम. डी. पाथ्रीकर, ट्रस्टी डॉ. एस. एस. शेख, डॉ. खान नाजमा, डॉ. सोनाली अग्रवाल, डॉ. प्रज्ञा सानप आणि इंजि. सोहा शेख यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.महोत्सवात शिस्त आणि सर्वोत्तम सादरीकरणाचे परीक्षण करण्यासाठी डॉ. परवीन अन्सारी, डॉ. अस्मिता खैरे, डॉ. जीवनज्योती निकाळजे, डॉ. जायभाये, अलका भोईटे, दीपाली खैरे, बहुरे उज्वला, शीतल तारो आणि डॉ. शेळके यांनी गरबा निरीक्षक म्हणून काम पाहिले.

Related Posts

आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश
आपला जिल्हा

आंध्र प्रदेश गाठून आरोपींच्या घरातून ६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात यश

September 15, 2026
बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
आपला जिल्हा

बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; शेतकऱ्यांच्या मोटारी व विजेच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

August 30, 2026
ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा
आपला जिल्हा

ढासला येथे विशेष ग्रामसभा; 224 घरकुलांना मंजुरी, शेतरस्ते, शाळा दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांसह विविध विकासकामांवर चर्चा

August 28, 2026
बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!
आपला जिल्हा

बदनापूर न्यायालयाचा कॅनरा बँक घोटाळ्यातील आरोपीना दणका!!

August 22, 2026
आपला जिल्हा

मनसेचा बदनापूर तालुक्यात झंझावात,आढावा बैठक

August 18, 2026
बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार
आपला जिल्हा

बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

August 11, 2025
Next Post
संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In