जपान येथे पार पडलेल्या आंतर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विश्वजीत सांगळे विजयी
फलटण / अमीर शेख
ओसाका (जपान) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या विश्वजीत सांगळे याने विजेतेपद पटकाविले आहे
विश्वजीत सांगळे हा मूळचा फलटणचा असून त्याने देश-विदेशात अनेक टेनिस स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे ओसाका इथे पार पडलेल्या स्पर्धेत जपानच्या चियो या खेळाडूला ६-४,६-७,२-६ अशा फरकाने पराभूत करून विश्वजीत ने विजेतेपद आपल्याकडे खेचून आणले
कोरोना काळा नंतरचे त्याचे हे पहिलेच विजेतेपद आहे हा विजय विश्वजितला येणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी व एटीपी टूर स्पर्धा च्या दृष्टीने प्रेरणा देणारा ठरणार असून विश्वजीत ने घेतलेले अथक परिश्रम आर्थिक मदतीसाठी ची धडपड या सगळ्याची विजेते पणामुळे चीज झाल्याचे विश्वजीत ची आई सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा सांगळे यांनी सांगितले
शारीरिक व मानसिक सुदृढता यांचे संतुलन साधत खेळाचा सराव उत्तम केल्यामुळे विजेतेपद मिळविता आल्याचे विश्वजीत ने यावेळी बोलताना सांगितले








