• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

गावमत by गावमत
October 11, 2026
in महाराष्ट्र
0
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार
0
SHARES
269
VIEWS

पैठण / स्वाती वाघ (तालुका प्रतिनिधी )

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र तुळजापूर येथून तुळजाभवानी देवीची पवित्र ज्योत घेऊन गावाकडे परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासात काळाने घाला घातला. बीड-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारात भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे गोळेगाव, जाफराबादवाडी आणि परिसरात शोककळा पसरली आहे.पिंपळगाव पांढरी शिवारात अपघातमिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव आणि जाफराबादवाडी येथील भाविक दरवर्षीप्रमाणे तुळजाभवानी देवीची पवित्र ज्योत घेऊन पायी गावाकडे परतत होते. पदयात्रेतील भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच आवश्यक साहित्याच्या वाहतुकीसाठी काही तरुण दुचाकीवरून त्यांच्यासोबत होते. दरम्यान, महामार्गावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तरुण गंभीर जखमी झाले.एकाचा घटनास्थळी, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यूया अपघातात अक्षय बिजलसिंग राजपूत (वय २८, रा. जाफराबादवाडी, व्यवसाय गॅरेज, कातशेवरी फाटा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अमोल औटे आणि गोरख म्हसकर (दोघेही रा. गोळेगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.दरम्यान, शुभम आघाने (वय २०, रा. चिमणापूर) हा देवीची ज्योत हातात घेऊन चालणारा तरुण या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेलीअपघातानंतर कंटेनरखाली अडकलेली दुचाकी चालकाने न थांबवता सुमारे पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची माहिती आहे. चित्तेपिंपळगाव पुलाजवळ दुचाकी खाली पडल्यानंतरही चालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पळ काढला.करमाड पोलिसांकडून तपास सुरूघटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत करण्यात आली. फरार कंटेनरचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या प्रवासात घडलेल्या या दुर्घटनेने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. तीन तरुणांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
महाराष्ट्र

फलटण मधील प्रभाग 9 मध्ये 15 ऑगस्ट व स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकास कामाचे उद्घाटन

August 18, 2026
Next Post
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In