उरण दि 14 (विठ्ठल ममताबादे )श्री स्वामी समर्थ समितीमार्फत मोठ्या उत्साहात ”गुरुपौर्णिमा” साजरी करण्यात आली. यावेळी उलवे नोड सेक्टर 8 एफ, प्लॉट क्रमांक 28 या परिसरातील सर्व अबाल वृद्ध व लहान थोरांनी श्री स्वामींच्या मंदिरात जाऊन श्री स्वामींचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय सुंदर नियोजन या समितीमार्फत करण्यात आले होते. या उत्साहात आणखीन भर पडली ती म्हणजे श्री स्वामी समर्थ समितीमार्फ़त नुकतेच सुरु असलेल्या ”बालसंस्कार मधील मुलांची. या मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्तचे औचित्य साधून समितीमार्फत ठरविण्यात आले की ”गुरुभेट” म्हणून शैक्षणिक वस्तू देण्याचे त्याप्रमाणे त्या वस्तू देण्यात आल्या.जेणेकरून संस्काराची सुरुवात ही लेखनीतूनच होते. त्यामुळे समितीचे नेतृत्व करणारे समाजसेवक गौरव म्हात्रे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते.








