वसमत / इसाक पठाण
ऊस पीकाला रोगराई पासून वाचविणे व उसाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकत पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर ड्रोनणद्वारे औषध फवारणीचा यशस्वी प्रयोग पूर्णा सहकारी साखर कारखान्याने करुन दाखविला यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
ऊसाचे रोगांपासून संरक्षण करुन उसाचे उत्पन्न दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याच्या दृष्टिकोनातून रविवार दिनांक 17 जुलै रोजी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश दांडेगावकर यांच्या शेतामधील उसाच्या फळावर ड्रोन द्वारे फवारणी करण्याच्या यशस्वी प्रयोग करण्यात आला यावेळी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आपल्याही भागात उसाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच यामध्ये दहा-पंधरा टक्के टनेज वाढविण्यासाठी पूर्णा सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना ड्रोन द्वारे आपल्या उसाच्या फळावर फवारणी करण्याचे आवाहन करण्यात येत होते यासाठी वसंत दादा इन्स्टिट्यूट निर्मित औषध सुद्धा कारखाना प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे या ड्रोन द्वारा उसाच्या फवारणी चा प्रत्यक्ष 17 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा पूर्ण कारखान्याचे चेअरमन जयप्रकाश जी दांडेगावकर यांच्या शेतामधील उसाच्या फळावर करण्यात आला अवघ्या पाच मिनिटात दहा लिटर औषध पाणी घेऊन सदरील ड्रोन द्वारे एक एकर उसाची फवारणी करण्यात आली असून प्रत्येक चार्जिंगला सदर ड्रोन हा दोन एकर फवारणी करू शकतो ड्रोन द्वारे फवारणी केल्यास उसाच्या प्रत्येक पानावर औषध समान वितरित होऊन उसाच्या पानांचा प्रत वाढण्यास मदत होते त्याचा फायदा उसाच्या कांड्या मधील लांबी आणि जाडी वाढण्यास मदत होऊन उसाच्या उत्पन्नात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते ऊस सभासदांसाठी कारखानाद्वारे ड्रोन ची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी प्रति एकर साडेसातशे रुपये इतका खर्च लागणार आहे याशिवाय वसंतदादा इन्स्टिट्यूट द्वारा निर्मित औषध सुद्धा कारखाना प्रशासन योग्य दरात उपलब्ध करून देणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी आपापल्या उसाच्या पिकावर ड्रोन द्वारे फवारणी करण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले यावेळी पूर्ण कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील शेतकी अधिकारी पी पी देशपांडे व विकास अधिकारी संदीप देशमुख कर्मचारी चौरे पाटील सह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते








