फलटण /अमीर शेख
फलटण शहरातील मारवाड पेठ येथे एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या दोन चोरांपैकी एक चोर पळून जाताना उडी टाकल्याने जखमी झाला असून दुसरा फरार झाला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की मारवाड पेठ येथील युवराज लोहाना यांच्या घरी दिनांक 17 रोजी रात्री अकरा वाजता छोटू अब्दुल शेख राहणार गजानन चौक फलटण व तोसिफ उर्फ बबलू पठाण राहणार फरांदवाडी (तालुका फलटण) हे चोरी करण्याच्या उद्देशाने दुसऱ्या मजल्यावर गेले होते बेडरूमची कडी काढत असताना घरातील लोक आवाजाने जागे झाल्याने ते पळून जात असताना बबलू पठाण याने वरून उडी मारल्याने तो जखमी झाला आहे तर छोटू अब्दुल शेख हा फरार झाला आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार गार्डी करीत आहेत









