अमीर शेख
फलटण (प्रतिनिधी)–:- फलटण शहरात सध्यस्थितीत डेंग्युच्या साथीने थैमान घातले असून कोरोणा काळात ज्या प्रकारे रुग्णालये भरली होती त्याचप्रकारे डेंग्युच्या साथीने शहरातील रुग्णालये भरली आहेत नुकताच डेंग्युने एक मृत्यु झाला आहे परंतू नगर परिषद प्रशासाने यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने अखेर फलटण शहर व तालुका पत्रकारांनी नाईलाजास्तव मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या निवास्थानासमोर आज लाक्षणिक उपोषण सुरू केले व लेखी आश्वासननंतर लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. फलटण शहरात डेंग्यूची साथ मोठया प्रमाणावर असून अनेक सामाजिक संघटना व पक्षांनी आपापल्या पद्धतीने आंदोलन करूनही शहरात नगर परिषदेने कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. शहरातील सर्व रुग्णालये रुग्णांनी भरली असून फलटण शहरातील नागरिक त्रासले आहेत. कागदोपत्री घोडे नाचवत नगर परिषद केवळ दिखावू काम करत आहे.त्यामुळे पत्रकारांनी आज विविध मागण्यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या घरासमोर उपोषण सुरू केले फलटण शहरात तत्काळ डेंग्यूच्या साथीच्या अनुषंगाने तत्काळ उपायोजना करणे ही प्रमुख मागणी करत पत्रकार कॉलनी लगत साचलेल्या पाण्याचे डबके तत्काळ बुजवून साफसफाई करण्याची तसेच पत्रकार कॉलनी लगत पाण्याच्या टाकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर निष्काळीपणामुळे कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उपोषणस्थळी पत्रकार लाक्षणिक उपोषणास बसल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी चर्चा करून पुढील 15 दिवसात काम करण्याचे लेखी आश्वासन दिले व तत्काळ सर्व मागणी विषयावर काम सुरू करण्यात आले. यानंतर लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ, अरविंद मेहता, सदाशिव मोहिते, दादासाहेब चोरमले, यशवंत खलाटे, युवराज पवार, सतीश जंगम, नसीर शिकलगार, शक्ती भोसले, वैभव गावडे, विक्रम चोरमले, विजय भिसे, दीपक मदने, सुमित चोरमले, अविनाश जाधव, उमेश गार्डे, अभिजित सरगर, काकासाहेब खराडे, विकास शिंदे, अनमोल जगताप, सचिन मोरे, संदीप जाधव,रोहित वाकडे, प्रसन्न रुद्र्भट्टे, शेखर जगताप, प्रशांत बावळे,प्रभाकर कर्चे, राजेंद्र गोडसे हे पत्रकार उपस्थीत होते.याचबरोबर अनेक सामाजिक संघटना व पक्षांनी आंदोलनस्थळी भेट देत लाक्षणिक उपोषणास पाठींबा दिला होता. यामध्ये माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, संजय गायकवाड, अरुण खरात,अमिरभाई शेख, प्रताप चव्हाण, धैर्यशील लोखंडे,विरसेन सोनवणे, अनिकेत नाळे, बबलू मोमीन, सनी काकडे, मंगेश आवळे, महादेव गायकवाड, दीपक देशमुख यांनी पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली. फोटो ओळ (फोटो उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या हस्ते आश्वासन पत्र स्विकारताना पत्रकार)









