फलटण / अमिर शेख
स्वराज फाउंडेशन आयोजित स्वराज दिवाळी महोत्सव भव्य शॉपिंग फेस्टिवल चे आयोजन दिनांक 19, 20, व 21 ऑक्टोंबर 2022 रोजी करण्यात आले आहे त्याविषयी महिला बचत गट यांचे स्टॉल बाबत महिला बचत गटाचा मेळावा काळुबाई नगर मलठण येथे आयोजित करण्यात आला.

त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य सौ जिजामाला नाईक निंबाळकर, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सौ उषा राऊत, केंद्रीय सूक्ष्म उद्योग च्या फलटण तालुका संयोजक सौ सुनीता सावंत मॅडम , नगरसेविका सौ मदलसा कुंभार तसेच या मेळाव्याचे आयोजक नगरसेवक श्री अशोकराव जाधव व माजी नगरसेविका सौ विजयाताई जाधव व महिला बचत गटाच्या अध्यक्ष सेक्रेटरी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या








