वसमत /इसाक पठाण
बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे माजी आमदार पंडितराव देशमुख सर यांचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला.
शनिवार दिनांक 6 मे 2023 रोजी वसमत शहरातील बहिर्जी स्मारक विद्यालयातील विस्तीर्ण प्रांगणात महाराष्ट्रातील मानाचा-सन्मानाचा मानला जाणारा ‘एम.एस.जोशी फाऊंडेशन पुणे सामाजिक न्याय परिषदे’चा पुरस्कार मिळाल्याबद्दल हु. बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार पंडितराव देशमुख सर यांच्या सत्काराचा विशाल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद) हे होते. माजी केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष, बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर , विद्यमान आमदार राजू भैया नवघरे, दै. गाववालाचे संपादक- उत्तमराव दगडू , , माजी आ. अॅड. मुंजाजीराव जाधव , शंकरराव खराटे , कार्यक्रमाचे आयोजक व बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी व चैतन्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. रामचंद्र बागल ,अॅड. रणधीर तेलगोटे , बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष उमाकांतराव शिंदे , गटशिक्षणाधिकारी तानाजीराव भोसले , प्रा. बी. डी. कदम सर, बी. बी. गुजराथी सर, बालासाहेब महागावकर, संस्थेचे कार्यकारी अधिकारी बी. एस. खिल्लारे सर , नितिन महागावकर, बालाजी राव ढोरे, प्रकाश लालपोतू, गोपाळराव शेळके सर (माजी शिक्षक-ब.स्मा.वि.वसमत.), तानाजीराव बेंडे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वसमत.) सचिन भोसले (उपसभापती), प्रा. नवनाथ लोखंडे सर, नागनाथ कोम्पलवार, वसंत चेपूरवार, विनोद झंवर, शेख अयुब शेख छोटेमियाँ, सत्यविजय अन्वेकर मामा,वत्सल विजय दगडू, इत्यादी मान्यवर मंडळी प्रमुख अतिथी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. जी. शेळके सर,पर्यवेक्षक बी. के. सावळे सर, पी. आर. देशमुख सर, के. जी. भोसले मॅडम मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.मामा जाधव सर (मराठी विभाग प्रमुख-ब.स्मा.म.वि.वसमत) यांनी सत्कारमूर्ती पंडितराव देशमुख सर यांचा विस्तारपूर्वक परिचय करून दिला.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती पंडितराव देशमुख सरांचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आमदार राजू भैया नवघरे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आदि मान्यवरांनी सत्कारमूर्ती पंडितरावजी देशमुख सर यांच्या विषयक भरपूर माहिती व त्यांच्या जीवनातील कांही प्रसंग सांगत आपापले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरीक, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी. डी. इंगळे सर (मुख्याध्यापक ब. स्मा. वि. गिरगाव) यांनी अत्यंत उत्कृष्ट रित्या केले. अध्यक्षीय भाषणानंतर के. जी. भोसले मॅडम यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. व कार्यक्रम समाप्तीनंतर सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.









