वसमत
इसाक पठाण
शहरातील पाणीटंचाई व इतर समस्या विषयी काँग्रेसच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला होता याला प्रचंड प्रतिसाद मिळाला
सिध्देश्वर धरणात मुबलक पाणी असून ही नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून दहा- दहा पंधरा-पंधरा दिवस नळाला पाणी येत नसल्याने शहरवास्यांचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहे तसेच शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे डास व रोगराईचे प्रमाण वाढले आहे या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अ. रहमान
यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर काँग्रेसच्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी एल्गार मोर्चा काढला होता यावेळी महिलांनी डोक्यावर घागर घेऊन एल्गार मोर्चात सहभाग नोंदविला व नगर पालिकेच्या अकार्यक्षम कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला
यावेळी प्रदेश काँग्रेस महासचिव अ हफीज अ रहेमान , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एम आर क्यातमवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख अलीमुद्दीन, माजी नगरसेवक रवी किरण वाघमारे, युवक अध्यक्ष तौहीद अफजल यांच्यासह मोठ्या संख्येने शहरवासी उपस्थित होते









