वसमत इसाक पठाण
टोकाई सहकारी साखर कारखान्याने उसाचे बिल द्यावे या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्याल्यासमोर अमरण उपोषणास सुरुवात केली आहे
यावर्षी टोकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस घेतला परंतु घेतलेल्या उसाचे बील अघाप अदा केले नाही त्यामुळे बीलासाठी ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यावेळी
उपोषणकर्त्यांचे मन वळविण्यासाठी नायब तहसीलदार तेलंग यांनी उपोषणाला भेट देऊन अमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु कारखान्याच्या अध्यक्षांनी बील देण्याची लेखी हमी दिल्या शिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असे उपोषणार्थीनी ठणकावून सांगितले.
या उपोषणार्थींना पाठिंबा देण्यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, अंबादासराव भोसले, विश्वनाथराव दळवी, मुंजाजीराव इंगोले ,बाबुराव भेंडेगावकर, उत्तम कदम तात्या, आशीर्वाद इंगोले, राजाराम खराटे, डॉक्टर पार्डीकर,माजी नगरसेवक धनंजय गोरे आदी नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला दरम्यान टोकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत थकीत बिलाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे याचा फटका सत्ताधारी गटाला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे









