जालना / तुकाराम राठोड
तालुक्यातील रामनगर येथे रस्ता संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.रामनगर-मानेगाव-सावंगी फाटा- सेवली रोड ची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे.आपण अनेक वेळा निवेदने दिली.परंतु यांचा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही.आपण सर्वांनी रास्त रोको आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी होऊन घोषणा दिल्या.प्रशासनाला जाग आणून दिली.व आपल्या रोडसाठी आपल्यालाच आंदोलन करावे लागत आहे ही शोकांतिका म्हणावी लागेल.असे यावेळी संतोष ढेंगळे सरपंच यांनी आपले मत व्यक्त केले.तसेच यावेळी इंजिनियर नागरे यांना निवेदन देण्यात आले.येत्या एक तारखेपर्यंत सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन नागरे यांनी आंदोलन करत्याना दिली.तेव्हा या आश्वासनानंतर आंदोलन करताना आपले रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळी पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून सदर आंदोलन मागे घेण्यात आले.









