वसमत/इसाक पठाण
सरसकट मराठा समाजास कुणबी आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी भोरीपगाव व बगडद येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले
कुणबी म्हणजे मराठा व मराठा म्हणजे कुणबी हे गृहीत धरून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बाभुळगाव गटातील भोरीपगांव व बगडद ग्रामस्थांनी पुर्णा सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ साखळी उपोषण केले या उपोषणात सखाराम आगलावे, मारोती आगलावे, बापुराव आगलावे, गोरख पाटील,अनिल आगलावे,एकनाथ आगलावे, अन्साजी आगलावे, रंगनाथ आगलावे,सुनील आगलावे,राधाजी आगलावे, शंकर सावंत,बंडू आगलावे, विष्णू आगलावे,विलास आगलावे, विठ्ठल आगलावे, बापुराव सावंत, शिवाजी आगलावे,परसराम आगलावे, यांच्यासह महिला पुरुष अबालवृद्ध तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते








