वसमत (इसाक पठाण)
वसमत व पूर्णा या दोन तालुक्याचा दोन दिवसीय उमुमी इज्तेमा शहरात संपन्न झाला
दिनांक 24 व 25 नोव्हेंबर रोजी वसमत व पूर्णा या दोन तालुक्याचा दोन दिवसीय उमुमी इज्तेमाचे आयोजन वसमत शहरातील पूर्णा सहकारी साखर कारखाना रोडवरील भव्य मैदानात करण्यात आले होते.
यावेळी मुस्लिम धर्म गुरूनी आपल्या धार्मिक प्रवचनात एक अल्लाह (ईश्वर)ची प्रार्थना करणे,, पैगंबर महमद सल्लम यांचे जीवन चरित्रावर चालण्याचे आवाहन केले.
सृष्टीचा निर्माता अल्लाह ( ईश्वर) आहे त्यांनीच सर्वश्रेष्ठ मानव जातीला निर्माण केले तोच जिवन देणारा आहे आणि तोच मृत्यू देणारा आहे पाप पुण्याचा हिशोब तोच घेणारा आहे स्वर्ग व नर्क त्यांनीच निर्माण केले जैसे कर्म करेंगा वैसे फल देगा अल्लाह म्हणून या जगात व त्या जगात दोन्ही जगात यशस्वी व्हायचे असेल तर सत्कर्म करा. अल्लाह(ईश्वर) च्या आदेशानेच सूर्य चंद्र वारा पाऊस सर्व काही चालते तोच पालनकर्ता आहे त्यामुळे त्या पालनकर्त्याची आम्ही भक्ती केली पाहिजे त्याचे आदेश मानले पाहिजे त्यांच्याशीच मदत मागितली पाहिजे. त्याच्याशिवाय कुणाशीही मदत मागू नये तोच मदत करणारा आहे अल्लाह (ईश्वर) वर सच्ची निष्ठा ठेवली पाहिजे व चांगले कर्म केले पाहिजे.
विवाह संभारंभात अगाऊ खर्च न करता साधेपणाने विवाह पार पाडावे मुलीच्या वडीलांना खर्च येणार नाही याची काळजी घ्यावी दहेज व हुंड्याची रक्कम घेऊ नये. नवरदेवाने आपल्या होणाऱ्या पत्नीला मेहेर द्यावा हे वाजीब आहे व वलीमा द्यावा हे सुन्नत आहे यावेळी सामुहिक विवाह पार पडले
सामुहिक दुवा करण्यात आली यावेळी हजारो हात दुवासाठी उठले विश्व शांती बरोबरच देशाचा विकास,एकता व अखंडता ,प्रेम बंधूभाव मानव कल्याण साठी अल्लाह चरणी दुवा करण्यात आली दुवा नंतर इज्तेमाची सांगता झाली
यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या इज्तेमा साठी वसमत व पूर्णा तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी उत्तम नियोजन केले होते मैदानावर भव्य शामियाना, भव्य स्टेज, उत्तम साऊंड सिस्टीम,वजू व नमाजाची व्यवस्था, पिण्यासाठी मोफत सिलबंद पाणी व मोफत चहा वाटप करण्यात आले या बरोबरच माफक दरात जेवणाची व्यवस्था वसमत शहरातील मुस्लिम तरुणांनी केली होती. पार्किंगची ही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती वसमत शहरातील मुस्लिम डाक्टरांनी तसेच मुस्लिम मेडिकल स्टोअर्सच्या मालकांनी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे काम केले अर्थात इज्तेमाला येणाऱ्या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांची (साथीची) सेवा करण्यात कोणीही कमी पडले नाही हा इज्तेमा यशस्वी करण्यासाठी अल्लाह (ईश्वरा)च्या कृपेने सर्वांनी एकत्र प्रयत्न केले त्यामुळे इज्तेमा यशस्वीरित्या संपन्न झाला.









