लोणार बुलडाणा
जिल्हा विशेष प्रतिनिधी बुलडाणा
प्रा मो लुकमान कुरैशी
येथील शहराचा विकास व्हावा म्हणून लोणार नगरपालिका अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमध्ये पैशासाठी तहसीलदार व त्यांच्या टिमकडुन अडथळा निर्माण करण्यात येत आहे तरी संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरपालिकेचे बांधकाम सभापती सौ रंजना मापारी यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोणार शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून या ठिकाणी देश-विदेशातून अनेक पर्यटक सातत्याने येत असतात या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहराच्या विकास आराखड्यासाठी निधी मंजूर केलेला आहे. या निधी मधून अनेक विकासात्मक कामे नगरपालिकेच्या अंतर्गत करण्यात येत आहेत या कामासाठी मुरूमासह अनेक प्रकारच्या गौण खनिजाची आवश्यकता आहे या कामासाठी गौण खनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी देण्यात यावी म्हणून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्याकडून लोणार तहसीलदार यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे
त्या पत्रामध्ये गौण खनिजापोटी लागणारी राॅउल्टी संबंधित ठेकेदाराच्या बिलातून वसूल करून शासनाच्या महसूल विभागाकडे देण्यात येणार असल्याचे पञ सुद्धा तयार करण्यात आले आहे परंतु केवळ पैशासाठी तहसीलदार , नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, व पटवारी त्यांच्याकडून गौण खनिजाचे ट्रॅक्टर अडवुन त्यांच्याकडे पैशाची मागणी करीत आहेत पैसे न दिल्यास सदरची वाहने पोलीस स्टेशन कडे जमा करत आहेत अशाप्रकारे लोणार विकास आराखड्यातील कामात खोडा घालत आहेत. शहरांमध्ये अनेक खाजगी बांधकामे करण्यात येत आहे त्या कामासाठी शासनाकडे कुठलेही रॉयल्टी चे पैसे जमा न करता हजारो ब्रास मुरुम,खड्डी,डब्बर, चोरुन आणलेली वाळु वापरण्यात येत आहे या कामांमध्ये मंडळ अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार तलाठी आपले हात ओले करून घेत आहेत व शासनाच्या करोड रुपये महसूल चे नुकसान करीत आहेत तरी तहसीलदार व त्यांच्या टीमची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मापारी यांनी महसूल मंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.









