वसमत (इसाक पठाण)
वसमतचे लोकप्रिय व विकासप्रिय आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हयातनगर व वसमत शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षात प्रवेश केला आहे
वसमत तालुक्यातील मौजे हयातनगर येथील युवा नेतृत्व अनिल भाऊ सारंग हे आमदार राजू भैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये शेकडो कार्यकत्यासह प्रवेश केला त्यावेळी सभापती तानाजी बेडे .उपसभापती सचिन भोसले . युवक विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद इंगोले युवक तालुका अध्यक्ष मनोज भालेराव तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके उपस्थित होते. अनिल सारंग यांच्या सूचनेनुसार जनार्दन नारायण सारंग यांची हयातनगर सर्कल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली व आकाश सारंग यांची हयातनगर शाखाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
तसेच नुकतेच वसमत शहरातील सय्यद समीर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षात प्रवेश केला
यावेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत परिसरात भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती
विशेषतः मतदारसंघांतील तरुण कार्यकर्त्यांचा ओढा आमदार राजू नवघरे यांच्या कडे वाढत आहे
यावेळी आमदार राजू नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजीब पठाण, शहर कार्याध्यक्ष अमजद खान ऊर्फ नम्मू, सय्यद इम्रान, मोबीनदा, एन.आय.पठाण,शेख युसूफ ऊर्फ मिठ्ठू यांच्यासह मोठ्या संख्येने नेते कार्यकर्ते उपस्थित होते








