फलटण /अमीर शेख
फलटण मधील प्रभाग 9 मध्ये 15 ऑगस्ट व स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध विकास कामाचे उद्घाटन तज्ञ करण्यात आले यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ज्येष्ठ नेते प्रल्हाद पाटील शिवरूप राजे खर्डेकर नगरसेवक सोमाशेठ जाधव अभिजीत भैय्या निंबाळकर रंणजित बाबा भोसले जाकीरभाई मणेर मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला प्रभाग नऊ मध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून मंजूर अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे उद्घाटन नगराध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण शाळेच्या मुलांना वह्या वाटप तसेच वृद्धांना बसण्यासाठी सिमेंट बेंच बसवण्यात आले असे विविध उपक्रम विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले. विद्यमान नगराध्यक्ष श्री समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की प्रभाग 9 ची उमेदवार कुमारी राझिया मेटकरी यांच्या म्हणण्यानुसार प्रभागांमध्ये इथून पुढे विकास कामे होत राहतील राझिया मेटकरी हिचा पराभव आमच्या जिवारी लागला आहे तिला नगरसेवक करूनच दाखवणार या प्रभागातसंपूर्ण ताकद तिच्या पाठीशी देण्यात येईल असे प्रतिपादन नगराध्यक्ष यांनी आपल्या भाषणात केले. रंणजीत दादा म्हणाले मेहबूब मेटकरी हा कधीही खचून न जाणारा माझा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पक्षाच्या माध्यमातून त्याला ताकद देण्यात येईल तसेच प्रभाग 9 मध्ये सर्व विकासकामे साठी निधी कमी पडून देणार नाही रंणजीत दादा यांनी राझिया मेटकरी हिला हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे दवाखाना या समितीवर संचालक म्हणून घेण्यात आल्याची घोषणा केली तसेच फिरोज भाई शेख व मेहबूब भाई
मेटकरी यांनी मेटकरी गल्ली येथील मुस्लिम सभागृहाच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी केलेल्या मागणीच्या निधी साठी रुपये 1200000 लाख नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याचे प्रतिपादन केले तसेच मेहबूब भाई मेटकरी यांनी इतर समाजासाठी मेटकरी गल्ली प्रभाव नऊ मध्ये सभागृह बांधण्यासाठी मागणी केली असता त्यासाठी पण रुपये 700000 लाख मंजूर करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी रणजीत .भोसले बाळासाहेब कदम अमोल सस्ते फिरोज भाई आतार रियाज भाई इनामदार बाळासाहेब मेटकरी शगीर भाई शेख बबलू भाई मोमीन आजी-माजी नगरसेवक पंचक्रोशीतील बहुसंख्येने लोक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज इनामदार यांनी केले कुमारी राझिया मेटकरी यांनी सर्वांचे आभार मानलेण







