हिंगोली/ इसाक पठाण
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री आदित्यजि ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली.
युवासेना सचिव वरुण देसाई, युवासेना युवती सचिव सौ. दुर्गाताई भोसले, युवासेना कार्यकारणी सदस्य कु. सुप्रदाताई फातर्पेकर, युवासेना कार्यकारणी सदस्य सिद्धेश कदम युवासेना युवती संपर्क प्रमुख हिंगोली कु. गिताताई कदम यांच्या सुचनेनुसार.
लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोषदादा बांगर , माजी सहकारमंत्री जयप्रकाशजी मुंदडा , युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम व युवासेना जिल्हाप्रमुख कन्हैया बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील युवती संगठन बळकट करण्यासाठी युवतीसेना प्रमुख हिंगोली यांनी युवतींच्या जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यासाठी शिवसेना युवतीसेना मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवती व महिला साठी मुलाखतीचा कार्यक्रम दि.8मे 2022 रोजी वसमत येथे पतंगे हॉस्पिटल इस्सार पेट्रोलपंपाजवळ नांदेड रोड या ठिकाणी घेण्यात आला होता . यामध्ये वसमत तालुक्यातील व जिल्ह्यातील युवती व महिलांनी आपल्या नावांची नोंदणी करून मुलाखती दिल्या
डॉ सौ रेणुका गजानन पतंगे युवासेना युवती जिल्हाप्रमुख हिंगोली यांच्याकडे मोठ्याप्रमाणात युवासेना युवती व महिला यांच्या मुलाखती घेतल्या त्याच्या मुलाखती मधून काही दिवसांत नवीन युवासेना युवती च्या हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्यात येईल व आगामी येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकीत युवतींना संधी उपलब्ध करून देऊ अशी माहिती युवासेना जिल्हा प्रमुख डॉ सौ रेणुका गजानन पतंगे यांनी दिली






