नांदेड / इसाक पठाण
जनतेची सेवा व महाराष्ट्राचा विकास यासाठी आम्ही वचनबद्ध असून यासाठी प्राण जाए पर वचन न जाई हेच आमचे हिंदुत्व आहे मनसे भाजपचे नाव न घेता त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार नांदेडच्या सभेत युवासेनाप्रमुख तथा राज्याचे राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे पावडे वाडी येथे शंभर खाटांचा सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाला आहे त्यामुळे निळा,आलेगाव ,कासर खेडा ,देगाव,पासदगाव,पुयणी,तरोडा,तरोडानाका,लिंबगाव, या ग्रामीण भागातील नागरिकांना लांब विष्णूपूरीला न जाता जवळच आरोग्य सेवा उपलब्ध होणारं आहे पैसा व वेळेची बचत होणार आहे तसेचव वेळेवरच आरोग्य सेवा उपलब्ध होणारं आहे
55 कोटी रुपये खर्च करून वाडी येथे उभारण्यात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपुजन युवा सेना प्रमुख तथा राज्याचे राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडले
यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड करीत असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांचा पाढाच वाचला शिवरायांच्या किल्ला विकासासाठी दिलेली भरीव रक्कम शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती तसेच पांदन रस्ते आदिंचा त्यांनी विशेष उल्लेख केला तसेच भविष्यात राज्यातील जनतेची सेवा करून महाराष्ट्राला देशात नंबर वन राज्य बनविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे नमूद करून विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला रघुकुल रितं सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाई हेच आमचे हिंदुत्व असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले
यावेळी उच्च व शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, माजी मंत्री कमल किशोर कदम,खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले तसेच राज्यांचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्हि .सी च्या माध्यमातून मार्गदर्शन केले यावेळी खासदार बंडु जाधव, आमदार संतोष बांगर, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी इटंनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर , जिल्हा पोलिस अधीक्षक शेवाळे,मनपा आयुक्त सुनिल लहाने, वैद्यकीय अधिष्ठा भोसीकर आदिंसह मोठ्या प्रमाणात नागरिक महिला व शिवसैनिक उपस्थित होते






