बदनापूर :- (शेख नजीर इनामदार)
येथे दिनांक 7 मे रोजी बदनापूर तालुक्याची लोक अदालतिचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात थकलेली घरपट्टी व पाणीपट्टी ची दोन वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीची थकबाकी खातेदाराकडे बाकी होती त्याबाबत जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव पारवेकर तसेच बदनापूर न्यायालयाचे न्यायाधीश श्री परदेशी साहेब व गटविकास अधिकारी श्री हरकळ साहेब यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची आठ दिवसापूर्वी बैठक घेऊन त्यांना थकबाकी मध्ये असलेल्या खातेदारांची यादी न्यायालयात सादर करणे बाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या नुसार सदर यादी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी न्यायालयात सादर केली. माननीय न्यायालयाने संबंधित खातेदारांना थकबाकी असलेल्याना कर भरण्यात यावा नसता सात मे रोजी न्यायालयात लोक अदालत मध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने काही खातेदारांनी आपला कर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे सात मे पूर्वी जमा केला तसेच काही लोकांनी दि 7।5।2022 रोजी न्यायालयात उपस्थित होऊन आपल्याकडे असलेल्या कराचा भरणा केला आहे तालुक्यातील 53 ग्रामपंचायतिच्या खातेदारानी आपला कर ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकाकडे भरणा केला या कराची तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मिळून एकूण रक्कम रुपये सोळालाख वीसहजार सहाशे चाळीस (16,20640) इतका कर ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात आला आहे अशा रीतीने ग्रामपंचायतीचा मोठ्या प्रमाणात कर वसूल झाला असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच या लोक अदालत मध्ये बदनापूर न्यायालयाचे न्यायाधीश परदेशी साहेब गटविकास अधिकारी हरकळ साहेब अधिकारी रतन जिने आणि समीर जाधव तसेच तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामसेविका उपस्थित होते







