• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीस पाठविले यमसदनी…

गावमत by गावमत
June 13, 2022
in महाराष्ट्र
0
अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पतीस पाठविले यमसदनी…
0
SHARES
342
VIEWS

लोणार/प्रा लुकमान कुरैशी

 लोणार तालुक्यातील वझर आघाव गावातील रामदास सरकटे हा पत्नी च्या अनैतिक संबंधात अडथळा ठरू लागला.या बाबीमुळेच पत्नी   पतीला कायमचे संपवण्यासाठी प्रियकर आणि पोटच्या अल्पवयीन मुलाच्या मदतीने कट शिजवला.एका शेतात आधी दोराच्या साह्याने गळफास देऊन नंतर डोक्यात दगड घालून पतीची हत्या करण्यात आली.नंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. ही खळबळजनक घटना भूमराळा येथे उघडकीस आली.

बिबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुमराळा शिवारात जनाबाई प्रकाश चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत ९ जून रोजी रात्री ८ वाजता रामदास त्र्यंबक सरकटे याचा मृतदेह आढळून आला.या प्रकरणी बिबी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.ठाणेदार एल. डी. तावरे यांनी तपासचक्रे गतीने फिरवली. चाणाक्षबुद्धीने अवघ्या १२ तासांतच खुनामागील सूत्रधारांचा बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार एल.टी. तावरे व त्यांच्या टिम यांनी पर्दाफाश केला.घडविलेल्या हत्याकांडामागे पत्नी,अल्पवयीन मुलगा आणि पत्नीचा प्रियकर असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस उपनिरीक्षक गोपाल राठोड,पोहेकॉ कलीम देशमुख,नाईक पोलीस शिपाई अरुण सानप,अर्जुन सांगळे व नितीन मापारी यांनी तपासकार्यासाठी मदत केली.
ज्ञानदेव रामप्रसाद आघाव (३४) हा या हत्येतील मुख्य सूत्रधार असून,तो मृताच्या पत्नीचा प्रियकर आहे. ज्ञानेश्वरची ४२ वर्षीय प्रेयसी तथा मृताची पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाने हे कृत्य केले.गुन्हा केला म्हणून पोलीस दप्तरी विधि संघर्षग्रस्त बालक म्हणून १५ वर्षीय बालकाची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३०२,१२० ब, ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया,अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या १२ तासांतच हा गुन्हा उघडकीस आणण्यात बीबी पोलिसांना यश आले. यापूर्वीही भुमराळा शिवारातील खुनाचा गुन्हा बीबी पोलिसांनी बारा तासांत उघडकीस आणला होता.
पोलीस भुमराळा गावात तपासाकरिता गेले असता ग्रामस्थांच्या चर्चेवरून त्यांना दिशा मिळाली.आरोपी ज्ञानेश्वर आघाव व मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली.तसेच मृत व आरोपी पत्नीत वारंवार वाद,भांडण व्हायचे,अशी माहिती समजल्यानंतर त्यामागील मूळ शोधण्यात पोलीस यशस्वी ठरले.

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
17 जुन 2022 रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप व शासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा.

17 जुन 2022 रोजी शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप व शासनाच्यावतीने महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कारांचे वितरण सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In