• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

प्रशासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईने हाडाच्या शेतकऱ्याचा गेला हकनाक बळी,पत्रकार अजित पाटील यांनी केली मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस अध्यक्षांकडे लेखी तक्रार

गावमत by गावमत
July 13, 2022
in महाराष्ट्र
0
प्रशासकीय यंत्रणेच्या बेपर्वाईने हाडाच्या शेतकऱ्याचा गेला हकनाक बळी,पत्रकार अजित पाटील यांनी केली मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेस अध्यक्षांकडे लेखी तक्रार
0
SHARES
2
VIEWS

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )खाजगी कंटेनर गोदामांनी त्यांच्या गोदामांच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शेतकर्‍यांना शेतीत ट्रॅक्टर व अन्य वाहने नेण्यासाठी किमान 12 ते 15 फुटींचा रस्ता कंटेेनर गोदामांच्या बाहेरील चारही बाजूनेे ठेवणे बंधनकारक असतांनाही उरण तालुक्यात या नियमांनाच फाट्यावर मारले जात आहे.त्या बाबत ज्या प्रशासकीय यंत्रणेने अशा नियमाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे ती यंत्रणाच धृतराष्ट्रा सारखी वागत असल्याने उरण तालुक्यातील एका ‘हाडाच्या शेतकर्‍याचा’ हकनाक बळी गेला आहे. याबाबत उरण मधील पत्रकार अजित पाटील यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे लेखी तक्रार करून आपली कैफियत मांडली आहे. तर या तक्रारीची प्रत येत्या काही दिवसात बांधपाडा ग्रापंचायतीला देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

     उरणच्या खोपटे गावातील शेतकरी तथा पत्रकार  अजित पाटील यांचे वडील स्व. श्री. रामनाथ रघुनाथ पाटील यांचा कुटूंबियांसह शेतावर खरीपाची पेरणी करायला गेलेले असतांना चक्कर येऊन मृत्यू झाला. ज्या ठिकाणी पाटील यांची शेती आहे .त्या संपुर्ण खाडीतील शेतकर्‍यांना शेतीवर जाण्यासाठी बाजुच्या ऑल कार्गो लॉजिस्टीक या प्रकल्पाने किमान 12 ते 15 फुटांचा ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढा रस्ता ठेवणे बंधनकारक असतांना देखील त्यांनी तो ठेवलेला नाही . त्यामुळे शेतावर चक्कर येऊन पडलेल्या रा.र.पाटील या शेतकर्‍याला वेळेवर उपचारासाठी नेता आले नाही. शेतांच्या बांधांवरून उचलून आणून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याुमुळेच भविष्यात अशा घटना घडू नयेत या साठी उरण तालुक्यातील सर्वच कंपन्यांनी त्यांच्या प्रकल्पाच्या चारही बाजुने शेतकर्‍यांना शेतीवर जाण्यासाठी किान 12 ते 15 फुटांचा रस्ता ठेवला जावा अशी मागंणी या पत्रांतून अजित पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने देखील यापूर्वीच तालुक्यातील अनधिकृत कंटेनर यार्डांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेली आहे. मात्र तहसीलदारांनी त्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे . त्या मागणीत देखील पत्रकार संघाने सर्वच कंटेनर यार्डांनी त्यांच्या प्रकल्पाच्या पाठीमागे असणाऱ्या शेतीत शेतकऱ्यांना जाण्यासाठी कंपन्यांनी प्रकल्पाच्या चारही बाजूने किमान  12 ते 15 फुटांचा    रस्ता ठेवणेची मागणी केलेली आहे.

पाटील यांची शेती ज्या ठिकाणी आहे त्या खाडीपासून ते खोपटे कोप्रोली या रस्त्यापर्यंतची शेकडो एकर जमिन खरेदी करून त्या जमिनीवर शशिकिरण शेट्टी आणि त्यांचे पार्टनर यांनी ऑल कार्गो लॉजिस्टिक नावाचा प्रकल्प वसविला आहे . हा प्रकल्प वसवितांना प्रकल्पाच्या चारही बाजूनी पाठीमागील शेतीत शेतकर्‍यांना विनासायास जाण्यासाठी व ट्रॅक्रटर अथवा तत्सम वाहने नेण्यासाठी किमान 12 ते 15 फुटांचा रस्ता ठेवणे गरजेचे होते. या परिसरात प्रकल्प वसवितांना नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार्‍या सिडकोच्या नियोजनात देखील तसा नियम आहे. मात्र उरण तालुक्यातील उरण पुर्व भागात वसलेल्या बहुतांशी प्रकल्पांनी हा नियम पायदळी तुडविला आहे . तसाच तो ऑल कार्गो लॉजिस्टिक नावाच्या कंपनीने देखील पायदळी तुडविला आहे . स्थानिक तलाठी अधिकारी मंडळींनी देखील तालुक्याच्या तहसीलदारांना यापूर्वीच तशा प्रकारचा अहवाल सुपूर्द केलेला आहे. मात्र त्यानंतर ही गेली कित्येक वर्षे या कंपनीने शेतकर्‍यांसाठी रस्ता केलेला नाही. मध्यंतरी शेतकरी वर्गाने प्रशासनाला तक्रारी केल्यावर केवळ दोन ते अडीच फुटांचा रस्ता करण्याचा दिखावूपणा कंपनीने केला होता. मात्र तो देखील नैसर्गिक पाणी निचरा नाल्यावर आणि बांधावर अतिक्रमण करून रस्ता केला होता. जो सध्या मोठ्या प्राणात वाहून गेल्याचे दिसत आहे. आणि त्या रस्त्यावरून देखील ट्रॅकटर किंवा कोणतेही वाहन शेतकरी शेतीत नेऊ शकत नाही अशी स्थिती आहे. कंपनीने आपल्या प्रकल्पाच्या चारही बाजूने पक्क्या स्वरूपाचा रस्ता ठेवला असता तर आपल्या वडिलांना थेट वाहनाद्वारे दवाखान्यात चटकन नेणे शक्य झाले असते आणि त्यातून पाटील यांच्या वडिलांचे प्राण वाचविणे शक्य झाले असते. त्यामुळेच पाठीमागील शेतीत जाण्यासाठी रस्ता न ठेवणार्‍या ऑल कार्गो लॉजिस्टिक प्रकल्पाच्या भोंगळ कारभारामुळेच आणि स्थानिक प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षामुळे आपल्या वडिलांचा हकनाक बळी गेला असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार अजित पाटील यांनी मुख्यमंत्री , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.तर या तक्रारीची प्रत येत्या काही दिवसात बांधपाडा ग्रापंचायतीला देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

चौकट :- दोन दिवसांपूर्वीच तालुक्याच्या महसूल विभागाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे येथील जासई विभागाचे मंडल अधिकारी संदीप रमाकांत रोडे यांना अनधिकृत कंटेनर यार्डावर कारवाई करू नये याकरिता 20 हजार रुपायांची लाच घेतांना रंगेहात पकडण्यात आले आहे

Related Posts

महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले

April 7, 2026
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
महाराष्ट्र

दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

September 29, 2025
विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल
महाराष्ट्र

विद्यार्थ्यास मारहाण, पोलिसात गुन्हा दाखल

July 31, 2025
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ज्योती उदावंत यांना पुरस्कार

June 14, 2025
शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..
महाराष्ट्र

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच? प्रशासनाचे दुर्लक्ष..

June 7, 2025
महाराष्ट्र

वाहनांना ‘एचएसआरपी’ नाही; मग’आरटीओ’तील कामे विसरा !२०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक : नंबर प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य

June 7, 2025
Next Post
पुरग्रस्त कुरूंदावासियाना जमियत उलमा ए हिंदने दिला मदतीचा हात गरजू लोकांसाठी धान्य किटचे वाटप

पुरग्रस्त कुरूंदावासियाना जमियत उलमा ए हिंदने दिला मदतीचा हात गरजू लोकांसाठी धान्य किटचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In