वसमत/इसाक पठाण
जमियत उलमा ए हिंदने वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील पुरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात पुढे करत गरजूना धान्य व जेवणाचे साहित्य वाटप केले
तालुक्यातील कुरुंदा येथे ढगफुटी सदुश्य पावसाने थैमान घातले असून आसना नदीचे पाणी रात्री अचानक गावात शिरल्याने घरांत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने एकच धावपळ उडाली व सर्वत्र हाहाकार माजला होता पावसाचे व पुराचे पाणी शिरल्याने घरांत ठेवलेले धान्य संसार उपयोगी साहित्य यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने कितीएक संसार उघड्यावर आले आहे अनेकांना घरं दारे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे अचानक होत्याचे नव्हते झाल्याने पिडीत कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी प्रशासनासह इतर सामाजिक व राजकीय संघटना दानशूर व्यक्ती मैदानात उतरले आहेत त्यातच जमियत उलमा ए हिंद हिंगोलीच्या वतीने कुरुंदा येथील पुरग्रस्त नागरिकांना धान्य व जेवणाचे साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जमियत उलमा ए हिंद (महेमुद मदनी) चे जिल्हाध्यक्ष मौलाना मुबीन सिद्दीकी व पदाधिकारी उपस्थित होते








