हिंगोली / इसाक पठाण
काम पूर्ण झालेल्या बिल रक्कमेच्या 5 % रक्कम 40 हजार रुपये लाच गुत्तेदाराकडून स्विकारताना कळमनुरी नगर पालिकेचे मुख्याधिकारी , लेखापाल व लिपिकास एसीबी पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडून जेरबंद केल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे
या विषयी अधिक माहिती अशी की कळमनुरी नगर पालिका अंतर्गत तक्रारदार यांच्या मूलाने काम पूर्ण केलेल्या सिमेंट रोडच्या कामाचे बिल रक्कम 804611 /- रू.चा चेक देण्याकरिता सदर बिलाचे
5 टक्के रक्कम म्हणजे 40,000 /- रु . ची मागणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी उमेश बापूराव कोटिकर वय 52 यांनी केली या संदर्भात गुत्तेदाराच्या वडीलांनी ला.प्र. वि कार्यालयात दि. 14 जुलै 2022 रोजी तक्रार केली असतां पथकाने तक्रारीची पडताळणी करून दि.15 जुलै 2022 रोजी सापळा रचला असता
मुख्याधिकारी उमेश बापूराव कोटिकर यांनी लेखापाल राहुल विजय जाधव वय 31 व लिपिक मोहम्मद जाकिर हुसेन अहमद हुसेन वय 57 यांच्या मदतीने 40 हजार रुपये स्वीकारून स्वतःकडे घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले व तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली
सदरील यशस्वी सापळा कारवाई
डॉ राजकुमार शिंदे,
पोलीस अधीक्षक ,ला प्र वि नांदेड परिक्षेत्र ,नांदेड व
धरमसिंह चव्हाण
अपर पोलीसअधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र ,नांदेड.यांच्या मार्गदर्शनात
पर्यवेक्षण अधिकारी
निलेश सुरडकर
पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि. हिंगोली,
सापळा अधिकारी
प्रफुल्ल अंकुशकर
पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. हिंगोली
सापळा कारवाई पथकातील
विजय पवार, पोलीस निरीक्षक,
सपोउपनी /युनूस सिद्धीकी
पोह/विजय उपरे, पोना/ ज्ञानेश्वर पांचलिंगे, तानाजी मुंढे, मापोना /योगिता अवचार,
पोशि /राजाराम फुफाटे,
चापोना /हिंमतराव सरनाईक सर्व ला.प्र.वि.युनिट हिंगोली यांनी यशस्वीपणे पार पाडली .
हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.असे आवाहन
पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड,परिक्षेत्र नांदेड
मोबाईल नंबर 9623999944
पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. हिंगोली
मोबाईल नंबर 9822200959 यांनी केले आहे.








