बदनापूर
आमदार नारायण कुचे यांनी एका तहसीलदाराच्या पत्नीला अरेरावी करून अपमान केल्याचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून सदर महिला जिजाऊ ब्रिगेड ची जालना जिल्हाध्यक्ष असल्याचे सोशल मीडियावर नमूद करून आमदार कुचे यांनी माफी मागावी असे ऑडिओ मध्ये म्हंटले असले तरी आमदार समर्थकांनी काही ऑडिओ व्हायरल केले असून त्या मध्ये असा काही प्रकार घडलेला नाही असे म्हंटल्याने सध्या सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप ऑडिओ ची जोरदार चर्चा होत आहे दरम्यान आमदार कुचे यांनी सदर आरोप फेटाळून लावले आहे.
बदनापूर विधानसभा मतदार संघातील अंबड तालुक्याचे तहसीलदार काल १५ जुलै रोजी अचानक आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्या पत्नी राधा कडावकर ह्या रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी बदनापूरचे आमदार नारायण कुचे हे आले व त्यांनी राधा कडावकर यांना अरेरावीची व अश्लील भाषा वापरली असा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या ऑडिओत राधा कडावकर व सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांचे संभाषण झालेले असून या संभाषणात राधा कडावकर यांनी बदनापूरचे आमदार कुचे यांच्या भाषेवर आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी असा पवित्रा घेतला सदर ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाभरात या ऑडिओ ची चर्चा सुरु झाली.
सोशल मीडियावर आमदार कुचे यांचा निषेध केला जात आहे दरम्यान आमदार नारायण कुचे यांच्या समर्थकांनी रात्री उशिरा आमदार नारायण कुचे व रुग्णालयाचे डॉक्टर जाधव यांच्या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून आमदार कुचे हे डॉक्टरांना काल तुमही तिथे उपस्थित होता त्या ताईला काही मी चुकीचा बोललो का असा प्रश्न केला जात असून डॉक्टर म्हणतात तसा काहीच प्रकार घडला नाही तसेच अन्य एका ऑडिओ मध्ये संतोष जेधे व तारीख चाऊस या दोघांचा संवाद आहे त्या मध्ये म्हंटलेले आहे तुम्ही होते फेरोज शेख,डॉक्टर सह बरेच जण उपस्थित होते तेव्हा तहसीलदार साहेबांच्या मिसेस सर्वांना बाहेर जा असे म्हणत होते त्या तीनदा तेच वाक्य वापरल्यानंतर आमदार साहेबानी त्यावर म्हंटले कि मी आमदार आहे काही गल्ली बोळातील माणूस नाही नंतर तहसीलदारांच्या मिसेस बाहेर गेल्या तिथे आमदार काहीच त्यांना खाली वर बोलले नाही तसा काहीच प्रकार घडला नाही एकंदरीत सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप ऑडिओ व्हायरल होत असल्याने सध्या जोरदार चर्चा होत आहे.
मी बदनापूर विधानसभा मतदार संघाचा आमदार आहे व अंबड माझ्या मतदार संघात आहे १५ जुलै रोजी मी अंबड येथे दवाखाण्यात गेलो त्या ठिकाणी तहसीलदार ऍडमिट होते त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलो होते त्या ताई पण होत्या मी त्यांना कोणत्याही प्रकारे अरेरावी किंवा अश्लील भाषा वापरली नाही उलट त्याचा मला तीन वेळा तुम्ही बाहेर जा असे म्हणत होत्या तेव्हा तहसीलदारानी मला माफी मागितली त्या ताईंनी माझ्यावर केलेले आरोप राष्ट्रवादीच्या काही लोकांच्या सांगण्यावरून केले असून त्यांचे पती,डॉक्टर व त्या ठिकाणी उपस्थित असलेले २० ते २५ जणांनी जर सांगितले कि मी अरेरावी किंवा अश्लील भाषा वापरली तर मी त्यांची जाहीर माफी मागेन.
आमदार नारायण कुचे









