पुणे / समीर शेख
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात एकतर्फी प्रेमातून एका २७ वर्षीय मुलाने १६ वर्षाच्या मुलीच्या घरात शिरुन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून पाेलिसांनी याप्रकरणी आराेपीस अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी सोमवार १८ जुलै रोजी दिली .
याप्रकरणी आराेपी अजिंक्य विकास पाटील (वय-27,रा. चिखली,पुणे) यास अटक करण्यात आली आहे. याबाबत चिखली पाेलिसांकडे पिडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाेलिसांनी आराेपीवर बलात्कार व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३,४,७,८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकार फेब्रुवारी २०२२ राेजी घडला आहे. संबंधित आराेपी अजिंक्य पाटील हा मागील एक वर्षापासून येता-जाता मुलीकडे पाहून हसायचा.
२ सप्टेंबर २०२१ राेजी मुलीचा वाढदिवसा दिवशी त्याने तिच्या घरी येवून पिडित मुलीस बाेलला की, तु मला खुप आवडते माझ्याशी प्रेमसंबंध ठेव. मात्र, मुलीने त्यास त्यावेळी नकार दिला. त्यानंतर आराेपीने फेब्रुवारी २०२२ मध्ये मुलगी ही घरात एकटीच असल्याचे पाहून तिच्या घरात बळजबरीने शिरुन तिच्या घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध केले व जर तु ही बाब आई वडीलांना सांगितली तर तुला बघून घेताे अशी धमकी दिली. त्यामुळे मुलीने सदर प्रकार कुटुंबियांना सांगितला नव्हता. मात्र, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तिच्या कुटुंबियांनी आराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे. चिखली पाेलिस ठाण्याच्या महिला पाेलिस उपनिरीक्षक एस.मुंडकर याबाबत पुढील तपास करत आहे.








