वसमत/ इसाक पठाण
वसमत येथील सुप्रसिद्ध महिला डॉक्टर तथा युवा सेना युवती जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुका गजानन पतंगे यांच्या वतीने कुरुंदा येथील पुरग्रस्त महिलांना साडी वाटप तसेच आरोग्य तपासणी औषधी वाटप करण्यात आले
युवासेना युवती जिल्हाप्रमुख हिंगोली डॉक्टर रेणुका गजानन पतंगे यांच्या तर्फे कुरुंदा येथे पूरग्रस्त महिलांना ड्रेस वाटप तसेच लोकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले व औषधी वाटप करण्यात आली या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला
त्यावेळी उपस्थित डॉ रेणुका गजानन पतंगे , डॉ प्रीती प्रभाकर दळवी , डॉ बारे सर , वामनराव दळवी उपसरपंच, डॉ प्रभाकर दळवी, दत्तरामजी इंगोले पाटील , दीपक भाऊ इंगोले पाटील , नामदेवराव दळवी , अशोक दळवी , वामन दळवी , काशिनाथ दळवी , बाळू इंगोले जय लोखंडे , डॉ गजानन पतंगे , सय्यद आयास, सलमान पठाण यांनी घरोघरी फिरून सर्वांच्या भेटी घेऊन मोफत रुग्ण तपासणी केली व औषधी वाटप करण्यात आले त्यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.








