फलटण अमीर शेख
विक्री करण्याच्या हेतूने अवैध गुटख्याचे वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे
योगेश विलास सरगर वय 24 राहणार समता नगर मिरज जिल्हा सांगली हा त्याच्या ताब्यातील पिकप क्रमांक एम MH 10 AQ 4238 मधून गुटक्याचे विक्री करण्याचे हेतूने येत असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी फलटण दहिवडी रस्त्यावर झिरपवाडी तालुका फलटण गावच्या हद्दीत त्याला अडवून पिकअप ताब्यात घेतला असता त्यामध्ये अवैधरित्या विमल केसरी युक्त पान मसाला, सुगंधी तंबाखू ,आर एम डी पान मसाला असा एकूण सातशे एकोणीस किलो किमतीचा मुद्देमाल मिळून आला या सर्व मुद्देमालाची किंमत दहा लाख रुपये पंचनामा करून निश्चित करण्यात आली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे पोलीस निरीक्षक भरत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली योगेश सरगर यास अटक करण्यात आली आहे








