हिंगोली / इसाक पठाण
हिंगोली जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या शिष्ट मंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबईत भेट घेऊन वसमत तालुक्यातील पूरग्रस्तांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली
या वर्षी पावसाच्या सुरुवातीलाच वसमत तालुक्यात विशेषतः कुरुंदा गावात ढगफुटी सदुश्य पावसाने थैमान घातले या पावसामुळे घरदारे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मुंबई येथे भेटले व या शिष्टमंडळाने वसमत तालुक्यातील पूर परिस्थितीची व प्रचंड प्रमाणात झालेल्या नुकसानीची माहिती दिली व पूरपरिस्थिती वर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावे अशी मागणी केली तसेच पूर परिस्थिती मुळे नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई सरसकट लवकरात लवकर देण्यात यावी अशी ही मागणी निवेदन देऊन करण्यात आली
यावेळी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे, वसमत विधानसभा प्रभारी रामदास पाटील,संघटन सरचिटणीस फुलाजीराव शिंदे, नाथराव कदम जि.उपाध्यक्ष ,वसमत तालुका अध्यक्ष खोब्राजी पाटील नरवाङे, गणपत काळे ग्रा.पं.सदस्य कुरूंदा आदि उपस्थित होते.








