आदिल खान
बदनापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आता रंग भरला आहे. सर्वच उमेदवार आपापल्या परीने प्रचारात व्यस्त आहेत काही प्रत्यक्ष भेटून तर काही फोनद्वारे प्रचार करण्यात व्यस्त आहेत. त्याच पर्शवभूमीवर मांजरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचाराला रंग भरल्या चे चित्र आहे
ग्रामपंचायत निवडणुकीत आता रंग भरला आहे.मांजरगाव येथे तीन प्रभाग असून सर्वच उमेदवार आपापल्या परीने प्रचारात व्यस्त आहेत. गावातील वार्डातील मतदार, शेतवस्त्याकडे राहणारे मतदार यांच्याकडे मते मागण्यांसाठी आता उमेदवारांनी आपला मोर्चा वळविला आहे. विशेष म्हणजे मांजरगाव येथील एकही सदस्याची जागा बिनविरोध झालेली नसून सर्वच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत व आपले नशीब अजमावत आहेत
दरम्यान ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावपातळीवरील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक असते. बऱ्याच गावात वादविवाद होतात. विरोधी पॅनलच्या उमेदवारांशी बोलणे बंद करणे अशा घटना आपण कायम ऐकतो. मात्र मांजरगाव येथे याला अपवाद आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुकीचा प्रचार केला जात आहे.








