• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Friday, April 17, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home शैक्षणिक

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले संघाचे कौतुक

गावमत by गावमत
July 25, 2022
in शैक्षणिक
0
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले संघाचे कौतुक
0
SHARES
23
VIEWS

करमाळा, सोलापूर :

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या करमाळा तालुका शाखेच्या वतीने १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवार दि.२३ जुलै, २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा, जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर सन्मान सोहळा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, ॲड. बाबुराव हिरडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही एन माने, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे, भारत महाविद्यालयाचे प्राचार्य दहिभाते, दिगंबर बागल विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील, ग्लोबल विदयालयाचे मुख्याध्यापक महेश निकत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांमधील गुणवंतांचा सत्कार पुढील वर्षापासून या पत्रकार संघाने करावा अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रसार माध्यमांनी नकारात्मक बाबी मांडण्याबरोबर सकारात्मक बाबी मांडून बदल घडवून आणला पाहिजे. असे प्रतिपादन केले.

गणेश करे पाटील यांनी करमाळा तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडत असून त्याकडे शिक्षकांनी लक्ष देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. ॲड. बाबुराव हिरडे यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार महत्त्वाचे आहेत. शिक्षकांबरोबर पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतात गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पालक आपल्या पाल्यावर अपेक्षा लादतात, तसं न करता त्यांनी पाल्याला आवड, संधी, क्षमता हे तीन गुण पाहून करीयर करण्याची संधी दयावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, सूत्रसंचालन सचिन नवले तर आभार तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे यांनी मानले.

यावेळी भारत हायस्कूल जेऊर, दिगंबर बागल विद्यालय कुंभेज, दिगंबर बागल विद्यालय सावडी, नामदेवराव जगताप विदयालय झरे, त्रिमूर्ती विद्यालय टाकळी, श्री. छत्रपती शिवाजी हायस्कुल कोर्टी, उत्तरेश्वर हायस्कूल केम, न्यु इंग्लिश स्कुल घोटी, साडे वांगी, करमाळा ग्लोबल सायन्स आदी शाळेतील प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उपाध्यक्षा विजया कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, जेऊर शहराध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, तालुका संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, सदस्य माधुरीताई कुंभार, सदस्य संजय चांदणे, सदस्य श्रीमंत दिवटे धनंजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Posts

शेख महेक शेख करीम हिचे दहावीत यश
शैक्षणिक

शेख महेक शेख करीम हिचे दहावीत यश

June 9, 2023
महाराष्ट्र

17 जुलै रोजी नीट परिक्षा “नीट” परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

July 15, 2022
सेंट जॉन्स शाळेत सी. ई. मो रायन सर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा
आपला जिल्हा

सेंट जॉन्स शाळेत सी. ई. मो रायन सर यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा

July 8, 2022
वशेणी येथे 12 वी च्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप
महाराष्ट्र

वशेणी येथे 12 वी च्या मुलांना मोफत पाठ्य पुस्तक वाटप

June 25, 2022
रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायंन्स, बोरी -उरण चा १२ वीचा निकाल १००%
शैक्षणिक

रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल ज्यु. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायंन्स, बोरी -उरण चा १२ वीचा निकाल १००%

June 9, 2022
चौथे नॅशनल मास्टर गेम्स केरळ येथे आयोजित स्पर्धेत योगा विथ पूनम ग्रुप उरणच्या खेळाडूंचे सुयश
महाराष्ट्र

चौथे नॅशनल मास्टर गेम्स केरळ येथे आयोजित स्पर्धेत योगा विथ पूनम ग्रुप उरणच्या खेळाडूंचे सुयश

May 28, 2022
Next Post

राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र नाही आणि शत्रू नाही-

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक
  • बदनापूर येथे बस मोटारसायकल अपघात,एक जण जागीच ठार

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन सरकारी अधिकारी लाच घेताना पकडले गेले
  • गारखेडा धरणामध्ये पाय घसरून भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
  • श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त भव्य प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध याचा देखावा सादरीकरण
  • दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी दस्त नोंदणी करताना नागरिकांची अडवणूक

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In