फलटण / अमीर शेख
आज रियाज इनामदार यांची रेल्वे सल्लागार सदस्य पदी निवड झाले बद्दल आज खासदार रणजितसिंह नाईक यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र संघटक मंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, बजरंग गावडे, अमोल सस्ते उपस्थित होते ..
फलटण तालुक्यातील भाजपा तालुका अल्प संख्याक सेल चे अध्यक्ष रियाज इनामदार हे काम करीत आहेत समाजाचे अत्यंत चांगले काम करीत आहे सातारा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांसाठी अनेक सामाजिक काम ते करीत आहेत सामाजातील अनेक लोकांना दाखले मिळवुन दिले आहेत गोरगरीब लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत दिपावलीच्या सणांमध्ये मुस्लिम बांधवांसाठी घरोघरी जाऊन फराळ पोहचवणेचे काम करीत आहेत तसेच विविध सणांमध्ये ते काम करीत असतात याची पक्षाने दखल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिफारस केली व त्याची विभागिय रेल्वे सल्लागार समिती सदस्य पदी नेमणूक करण्यात आली आहे.
यामुळे रेल्वे प्रशासन व ग्राहक यांचे मध्ये समन्वय साधणे, तसेच रेल्वे चे अनेक योजना राबविल्या जातात ते सामान्य जनते पर्यंत रबिवणेचे पोहचवणे चे काम रियाज इनामदार यांचे कडुन केले जाईल या निवडीबद्दल विरोधी पक्ष नेते समशेर सिंह नाईक निंबाळकर, गटनेते अशोक जाधव,, लतिफ तांबोळी, बाळासाहेब कदम, धनंजय पवार, राजेश शिंदे, काका खराडे, सुनील जाधव, शरद झेंडे, राजाभाऊ निंबाळकर , विशाल नलवडे, शिराज भाई शेख, सचिन अहिवळे, राहुल शहा, राजाभाऊ देशमाने, निलेश चिंचकर, यांनी अभिनंदन केले







