फलटण / अमीर शेख
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ‘महाराष्ट्रातून मारवाडी व गुजराथी निघून गेले तर येथे काय उरेल?’ असे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या वादग्रस्त विधानामुळे व सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्यावरती टिकेची झोड उठलेली आहे. याचाच प्रत्यय फलटणमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सर्किट(गेस्ट) हाऊसला बैठक होऊन कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी बुधवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा. नाना पाटील चौक फलटण येथून मूकमोर्चा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावरती नेहण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
फलटण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, आझाद समाज पार्टी, आर पी आय, वंचित बहुजन समाज पार्टी, दलित पँथर इ. सर्व पक्षांच्या वतीने प्रांताधिकारी यांना निषेधाचे पत्र देण्यात येणार आहे आणि राज्यपालांची महाराष्ट्रातून उचल बांगडी करावी यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.
सर्व पक्षांच्या वतीने फलटण शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात येत आहे की ३ ऑगस्ट रोजी मोर्चामध्ये सहभागी व्हावे. या मीटिंगच्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशोकराव जाधव,, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महेंद्र(बबलुभैया) बेडके, अमीरभाई शेख,पंकज पवार
अल्ताफा पठाण.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हरिष(आप्पा) काकडे,शेखर हेंद्रे. शिवसेनेचे प्रदीप झनझणे, आझाद समाज पार्टीच्या वतीने सनी काकडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.







