सिंदखेडराजा तुकाराम राठोड
सिंदखेडराजा नगरीत संध्याकाळी श्री संत गजानन महाराज पालखीचे आगमन होताच, भक्तांनी मोठया उत्साहात शेकडोंच्या संख्येने जंगी स्वागत केले. सिंदखेडराजात दिंडीतील सर्वांनी जेवण करून मुक्कामी होते, तर दुसऱ्या दिवशी सिंदखेडराजा नगरीतून दि. 27 जुलै बुधवार रोजी सकाळी ठिक 6 वाजता, दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी श्री संत गजानन महाराज यांची पालखी परती च्या मार्गाने निघाल्यावर, सावखेड तेजन फाट्यावर नाश्त्याची सुविधा करण्यात आली. तर किनगावराजा येथे दुपारचे जेवण देण्यात आले. राहेरी या मार्गाने दुसरबीडला श्री गजानन माहाराज पालखीचे आगमन होताच, दुसरबीड येथील मोठे, छोटे व्यापारी, विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते, तथा सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, व परिसरातील खेड्यातील हजारो भाविक भक्तांनी जंगी स्वागत करुन, श्री गजानन महाराज पालखीचे व दिंडीतील महाराजांचे दर्शन घेतले. या भक्तिमय वातावरणात, काही भक्तांनी पाण्याची, तर कोणी फराळाची, तर काही भक्तत्तांनी चहा, यांची सुविधा करण्यात आली होती.
2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये परिसरातील जनतेला हे पाहता आले नाही, आणि यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्या नंतर श्रींचे भक्तीमय वातावरणात जनतेला दर्शन मिळाले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे व राष्ट्रवादीचे नेते डॉ. शिंदे, तर दुसरबीडच्या सरपंच सौ. ज्योती सांगळे व सरपंच पती प्रकाश सांगळे. आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ व काँगेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, जुनेद अली. या तीन जोड्यात फुगडी खेळतांना सर्व धर्म समभाव जनतेला पहावयास मिळाले. श्रींचे पालखीचे दुसरबीड येथुन बिबीला मुक्कामी परतीच्या मार्गावर प्रस्थान झाले. या वेळी
विविध पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, माजी आमदार तोताराम कायंदे, जिल्हा परिषद सदस्या पती, माजी सरपंच पंडितराव खंदारे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, माजी सभापती विलासराव देशमुख, भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे, भाजपा नेते माऊली मुंढे, सरपंच सौ ज्योती सांगळे. सरपंच पती प्रकाश सांगळे. भाजपाचे नेते डॉ. खरात. सामाजिक नेते टी.एन.मोगल. शिवसेना नेते गजेंद्र देशमुख. तंटामुक्ती अध्यक्ष याकुब शेख. उपसरपंच पती तौफिक शेख. लोकजागर परिवाराचे प्रविण गिते, कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष जुनेद अली,. महाराष्ट्र मच्छीमार संघटना विदर्भ प्रदेश अध्यक्ष कचरूजी भारस्कर, माजी सरपंच प्रकाश केवट. माजी सरपंच छगन खंदारे, माजी सरपंच वैभव देशमुख. सखाराम देसाई, वसंत जायभाये, निवृत्ती वायळ. शिवाजी गुंजाळ. प्राध्यापक सुधीर निकम, गजानन आघाव, बबन उदावंत. दिलीप देशमुख. संजय कायस्थ. डॉ. खराटे. डॉ. कुटे. आशिष संगवई. पंकज जाधव. रवी खंदारकर. प्राध्यापक सागर सांगळे. आकाश सांगळे. अशोक सोसे. नंदु देशमुख. उत्तम देशमुख, अनील बुधवत. गजानन हिवरकर. इरफान शेख. हशम कुरेशी, डोंगरे सर. सखाराम बरंडे, नंदुजी फुल्लारे, अमीर पटेल. मच्छिंद्र जेठे, नासेर शेख. संजय सोळंके. शब्बीर शेख. अमोल भोसले. संजय शेलार, अबरार शेख. रहेमान शेख, व इतर भक्त गण होते. यावेळी किनगावराजा पोलिस स्टेशन चे ठाणेदार युवराज रबडे. व दुय्यम ठाणेदार भारत चिरडे आणि त्यांचे सहकारी पोलिस यांचा तगडा बंदोबस्त होता.








