जालना / तुकाराम राठोड
जालना तालुक्यातील पाहेगाव-सावंगी तलाव येथील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन बुथ सक्षमीकरण अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना जसे की,पी एम किसान सन्मान निधी,उज्वला भारत गॅस,अन्नसुरक्षा योजना व इतर काही जे कल्याणकारी योजना आहे.
या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत तसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या का? याबद्दल प्रत्यक्ष भेटून लाभार्थ्यांशी संवाद साधून संपूर्ण माहिती घेऊन,भारतीय जनता पार्टी कार्यालय पाठवली आहे.सदर ठिकाणी विविध विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवाराची भेटी-गाठी झाली.यावेळी भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते बाबुराव खरात,परसराम तळेकर,बाबूलाल चव्हाण,तुकाराम राठोड,राजू राठोड,संजय रंधवे,शिवाजी राठोड,गजानन चव्हाण,संजय राठोड,पांडुरंग शेळके,अर्जुन तळेकर,गंगाराम मेंढरे,राधाकिसन बावणे,संतोष चव्हाण,लक्ष्मण चव्हाण व इतर काही कार्यकर्ते पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.








