वसमत : इसाक पठाण
हिंगोली जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून अटक केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले .
हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना संपर्क बबनराव थोरात यांच्या विरोधात पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे याचे वसमत तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून अटकेच्या निषेधार्थ शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून तीव्र आंदोलन करून त्यांनी उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदन देऊन अटकेचा निषेध केला
यावेळी माजी मंत्री डाॅ. जयप्रकाशजी मुंदडा , शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार , तालुका प्रमुख राजू चापके , अनिल कदम , शहर प्रमुख काशिनाथ पाटील भोसले , माजी तालुकाप्रमुख बालाजीराव तांबोळी, संभाजी बेले , माजी नगरसेवक धनंजय गोरे, जगदीश मोरे , माजी नगरसेवक नवीन कुमार चौकडा , माजी नगरसेवक राजेश पवार , सुरेश स्वामी , सुरज सरोदे , अजय सिंग , विकास तांबोळी विजेंद्र सिरसागर सौरभ भोसले अर्जुन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .








