• होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 2, 2026
गावमत
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुक प्रकरनातील आरोपी असलेल्या दिगंबर आगवणे आणखी एका गुन्ह्यात अटक ,6 दिवसांची पोलीस कोठडी

गावमत by गावमत
August 13, 2022
in महाराष्ट्र
0
चाळीस हजाराची लाच स्विकारताना नगर पालिका मुख्याधिकारी सह तिघे एसीबीच्या जाळयात
0
SHARES
119
VIEWS

फलटण : स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या तक्रारीवरुन फलटण पोलिसांनी दिगंबर आगवणे याला अटक करुन त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आता आगवणेच्या अडचणीत आणखीन वाढ झाली असून दुसऱ्या एका आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला फलटण पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पुन्हा 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने आगवणेचा पाय आणखीन खोलात गेला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या दिगंबर आगवणे याचा जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असून आता आगवणे याच्या आयुर ट्रेडिंग कंपनीसंदर्भात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दि. 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत आयमत गनिम शेख (रा. लक्ष्मीनगर, फलटण) यांनी दिगंबर रोहिदास आगवणे याच्या विरुध्द तक्रार दिली आहे.

तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, 2016 साली आयमत गनिम शेखर व त्यांचा भाऊ अमीर गनिम शेख या दोघांना दिगंबर आगवणे याने त्याच्या आयुर ट्रेडिंग कंपनीत 1 कोटी रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा दोन लाख रुपये परतावा देतो, चांगला फायदा होईल, मी तुम्हाला कंपनीत भागीदार करुन घेतो, असे अमिष दाखवले. त्यावेळी शेख यांनी आमच्याकडे 10 लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यावर आगवणे त्याचा मित्र विनोद धुमाळ हा तुम्हाला कर्ज काढून देण्यास मदत करेल. तुमच्या घरावर बँक ऑफ पटियाला येथून 45 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होईल. त्या बदल्यात धुमाळ याला 5 लाख रुपये कमीशन द्यावे लागेल असे सांगितले.

त्यावर शेख कुटुंबियांनी धुमाळ यांनी बँक मॅनेजरची भेट घडवून आणली. आमच्या घराची कागदपत्रे अपूर्ण असताना आगवणे व धुमाळ यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन शेख यांच्या नावावर कर्ज प्रकरण करुन आईवडिलांना जामीनदार करुन घेतले. पहिल्यांदा 25 लाखांचे कर्ज प्रकरण केले व त्यानंतर 15 लाख रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करुन घेतली. शेख कुटंबियांनी त्यांच्याकडील 10 लाख रुपये, कोळकीतील हेमंत जगताप यांच्याकडून 29 रुपये कर्ज, झिरपवाडीतील जमिनीपोटी ॲडव्हॉन्स मिळालेले 15 लाख रुपये असे 54 लाख रुपये दिगंबर आगवणे याला दिले. अशा प्रकारे बँकांचे कर्ज व घरातील रक्कम असे मिळून दिगंबर आगवणे याला शेख कुटुंबियांनी 95 लाख रुपये आयुर कंपनीत भागीदार करुन घेतो म्हणून दिलेले आहेत. आणखीन भांडवल लागणार म्हणून आगवणे याने अभ्युदय बँक पुणेचे कर्ज प्रकरण केले असून त्याला शेख यांना जामीनदार करुन घेतले आहे.

त्यानंतर परतावा येत नसल्याने शेख आगवणे याच्याकडे पैसे मागू लागले असता त्याने 95 लाख रुपयांपैकी फक्त 7 लाख रुपये परत दिले. त्यानंतर लवकरच आपले मोठे काम होणार आहे. तुमचे पैसे परत मिळतील असे 2016 सालापासून आगवणे शेख कुटुंबियांना सांगत होता. मात्र, 2020 साल उजाडले तरी देखील आगवणे याने 88 लाख रुपयांपैकी काहीच पैसे दिले नसल्याची शेख यांची तक्रार असून याबाबत त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात रोहिदास दिगंबर आगवणे रा. गिरवी, ता. फलटण याच्याविरुध्द तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात आगवणे याला अटक केली असून न्यायालयाने दि. 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अतिरेकीपणामुळे मिस्टर नटवरलाल अखेर गोत्यात

दिगंबर आगवणे याने राजकीय पक्षांच्या नेत्याशी संबंध जुळवून आपले वलय निर्माण केले होते. उंची गाड्यातून फिरणे, चैन करणे असे करता करता त्याने फलटण शहरासह आणखी इतर ठिकाणावरील काहींची 50 ते 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची चर्चाही फलटण तालुक्यात सुरु असून हा मिस्टर नटवरलाल त्याच्या अतिरेकीपणामुळे चांगलाच आता गोत्यात आला असल्याची फलटणकर बोलत आहेत.

Related Posts

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
महाराष्ट्र

संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत

October 31, 2026
बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
महाराष्ट्र

बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

October 18, 2026
गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..
महाराष्ट्र

गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

October 15, 2026
तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार
महाराष्ट्र

तुळजापूरहून ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कंटेनरची धडक; तीन तरुणांचा मृत्यूबीड-सोलापूर महामार्गावरील पिंपळगाव पांढरी शिवारातील दुर्घटना; एक तरुण गंभीर जखमी, दुचाकी पाच किलोमीटर फरफटत नेऊन कंटेनरचालक पसार

October 11, 2026
सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!
महाराष्ट्र

सहा दिवस उपोषण… तरी मुख्याधिकारी दूरच!

September 12, 2026
महाराष्ट्र

नपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुरु, ऑनलाईन अर्ज  

August 20, 2026
Next Post
शिवसंग्राम चे नेते आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; महाराष्ट्राची मोठी हानी

शिवसंग्राम चे नेते आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन ; महाराष्ट्राची मोठी हानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • गावमत.‌  स्पेशल.. रिपोर्ट..

आमच्याबद्दल

 

गावमत या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. गावमत या न्यूज पोर्टल चे संपादक परवीन नजाकत सय्यद आहेत .गावमत या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून गावमत चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही गावमत मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता गावमत पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला गावमत जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो जालना न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  9923307786/9421947786 या नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • e-paper
  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

ताज्या बातम्या

  • बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ४९ वस्तूंचा शैक्षणिक संच मोफतइयत्ता पहिली ते आठवीतील पहिल्या दोन पाल्यांना लाभ; ३० ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित
  • संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाचा आधार; आठ कुटुंबांना आठ लाखांची मदत
  • पाथ्रीकर कॅम्पसमध्ये ‘जलसा रास दांडिया’चा जल्लोष; ‘डिजिटल रील’ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान• शेकडो विद्यार्थ्यांचा दांडियाच्या तालावर ठेका; ६ तास परिसर जल्लोषमय• संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख पारितोषिकांचे वितरण
  • बीडमध्ये तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एसटी बसची धडक; पाच जणांचा मृत्यूएक जण गंभीर जखमी; रस्त्याच्या कामासाठी जबाबदार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In