बीड जिल्ह्यातील बामदळे वस्ती पाटोदा जवळ कार व आयशर टेम्पोचा भीषण अपघात होवूनलग्नासाठी निघालेल्या केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील सहा जण जागीच ठार झाल्याची घटना आज 14 आगस्ट रोजी सकाळी घडली.
बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र असलेले शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनामुळे शोकसागरात बुडालेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. आज काही वेळापुर्वी पुण्याहून केजच्या दिशेने निघालेल्या जिवाचीवाडी येथील सहा प्रवाशांचा या अपघातात जागिच मृत्यू झाल्याचे वृत्त येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
अहमदपूर-अहमदनगर मार्गावर बामदळे वस्ती (ता.पाटोदा) टेम्पो-स्विफ्टचा अपघात झाला. लग्नासाठी केजला निघालेल्या कारमधील सहा जणांचा जागीचं मृत्यू. मृतांत दोन लहानग्यांचा समावेश. पुण्याहून केज तालुक्यातील जिवाचीवाडीकडे जात असलेल्या कारला एका आयशर टेम्पोने चिरडल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन बालकांसह कारमधील सहा जणांचा जागिच मृत्यू झाला. याबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध होवू शकली नाही. मात्र बीड जिल्ह्यात हा दुसरा अपघाती धक्का असून जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.









