फलटण / अमीर शेख
फलटण शहर व तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गजानन चौकातील गांधी पुतळा बसविण्याच्या मागणी साठी 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता यासंदर्भात तहसीलदार व मुख्य अधिकारी यांचे सोबत राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली यावेळी पुतळा बसविण्याच्या मागणी संदर्भात चर्चा झाली त्यावेळी फलटण नगरपालिका मुख्य अधिकारी संजय गायकवाडसो यांनी पुतळा बसवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून गांधीजींचा पुतळा तयार आहे मात्र काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी पुरातत्त्व खात्याकडे तक्रारी केल्यामुळे पुतळा बसवण्यास तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून लवकरात लवकर पुरातत्व खात्याची ना हरकत घेऊन पुतळा बसवला जाईल अशी ग्वाही मा. तहसीलदारसो यांच्या समवेत दिली दिली तसेच उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी सकाळी दहा वाजता पुतळ्याच्या जागेवर सुशोभीकरण करून गांधीजींच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक पूजन करून अभिवादन केले जाईल असे लेखी आश्वासन दिले व उपोषण मागे घ्यावे असे आवाहन केले त्याला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.









