फलटण (प्रतिनिधी )–पटाया थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेमध्ये भारताच्या मूळ फलटणकर उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे या दुहेरी जोडीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली या दोघांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताचे प्रथमच पदार्पण झालेले आहे
आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी उन्नत आणि विश्वजीत सांगळे या भावांची दुहेरीतील पहिली जोडी ठरली असून या स्पर्धेमध्ये इटली, अमेरिका, इंग्लंड रुस ,मेक्सिको, जपान ,फ्रान्स इत्यादी देशातील खेळाडू सहभागी झाले होते आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये भारताने कधीही सहभाग नोंदविला नव्हता त्यामुळे सांगळे बंधूंच्या जोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली या खेळातील स्पर्धेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्या देशात उपलब्ध नसतानाही परदेशातील मार्गदर्शकाच्या मदतीने त्यांनी चांगली तयारी करत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली आहे या जोडीचे टेनिस क्षेत्रातून अभिनंदन होत आहे सांगळे बंधू मूळचे फलटणचे असून सध्या मुंबईमध्ये स्थायिक झालेले आहेत









