फलटण शहरातील गजानन चौकात भारतीय जनता पार्टी च्या वतीने. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर याचा पुतळा जाळून निषेध केला.यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून शहरात तानावपूर्ण शांतता आहे.
फलटण / अमिर शेख
भाजपच्या वतीने राष्ट्रवादी चे नेते तथा माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा पुतळा जाळण्यात आला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डि एड चौकात पुतळा जाळुन निषेध करण्याचा प्रयत्न केला पण फलटण शहर पोलीस प्रशासन ने वेळेत धाव घेतल्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेेनी पुतळा कोणाचा जाळला आहे व हे काय समजले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांचा चर्चा विषय झाला आहे नक्की पुतळा कोणाचा जाळला आहे .आगामी काळात भाजप व राष्ट्रवादी मध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
फलटण शहरात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे दिसत असल्याने पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.








