अतुल महालनकर / देऊळगावराजा
देऊळगावराजा कार चालवणे शिकत असताना ब्रेकऐवजी अॅक्सीलेटर दावले, त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला तुडुंब भरलेल्या विहिरीत कार कोसळली. यामध्ये कार शिकत असलेल्या महिलेबरोबरच मुलीचा मृत्यू झाला, तर पतीने कारमधून उडी घेतल्याने ते सुदैवाने बचावले. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी देऊळगावराजा येथे घडली.
स्वाती अमोल मुरकुट (वय ४०) व सिद्धी अमोल मुरकुट (वय १०) असे मृतकांची नावे आहेत. सध्या दिवाळीची सुटी असल्यामुळे डोरव्ही तालुका सिंदखेडराजा येथील अमोल दिनकर मुरकुट पत्नीला कार चालविणे शिकवत होते. कच्या रस्त्याने ने कार चालविणे शिकवत असताना
देऊळगावराजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत असताना ब्रेक लावण्याच्या ऐवजी त्यांच्या पत्नी स्वाती मुरकुट यांच्याकडून अॅक्सीलेटर दाबल्या गेले, त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून कार तुडुंब भरलेल्या ८० फूट खोल विहिरीत कोसळली. यामध्ये मुरकुट हे कसेबसे कारच्या दरवाजातून बाहेर पडले.
स्वामी मुरकुट व सिद्धी मुरकुट यांचा बुडाल्याने मृत्यू झाला.
सायंकाळी ७ वाजता काढली कार बाहेर
८० फूट विहीर आणि ७० फूट पाणी असलेल्या विहिरीमध्ये कार गाळात फसली होती. या कारमध्येच मायलेकीचे मृतदेह होते. ही कार बाहेर काढण्यासाठी विहिरीत उडी घेणाऱ्या पक्त तोताराम पिपळे या युवकाचाही मृत्यू झाला. उडी घेतल्यानंतर दीड तास तो बाहेरच आला नाही. बचाव पथकाने गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.








