हिंगोली शहर व ग्रामीण हद्दीतील विज वितरण कंपणीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची कार्यवाही हिंगोली एमआयडीसी परीसरातील २२० केव्ही उपकेंद लिंबाळा मक्ता येथील कार्यालयाच्या प्रांगणातुन विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातुचे साहित्य चोरी गेल्या बाबत पोस्टे हिंगोली ग्रा येथे गुन्हा दाखल होता तसेच दि .२ ९ .११.२०२२ रोजी १३२ केव्ही विद्युत उपकेंद्र हिंगोली येथुन विद्युत विभागाचे विविध उपकरणे व धातुचे साहित्य चोरी गेल्या बाबत पोस्टे हिंगोली शहर येथे गुन्हा दाखल होता . सदर गुन्हयाचे अनुषंगाने गोपनिय माहिती काढुन गुन्हे उघड करण्या बाबत पोनि श्री उदय खंडेराय यांनी स्थागुशा पथकास सुचना दिल्या होत्या त्याअनुषंगाने पोलीस पथकास गोपनिय माहिती मिळाली की , हिंगोली शहर व ग्रामीण हद्दीतील विद्युत कार्यालयातील विविध उपकरणांची चोरी हि लिंबाळा मक्ता येथील १ ) करण जिलान्या पवार २ ) विजय किसन काळे ३ ) संजय उर्फ काल्या पंडीत काळे ४ ) मुस्तकिन शेख शबाना यांनी मिळुन केली आहे तसेच ते सध्या लिंबाळा मक्ता एमआयडीसी परीसरात आहेत अशी माहिती मिळाल्या वरुन स्थागुशा पोलीस पथकाने आरोपी नामे १ ) करण जिलान्या पवार २ ) विजय किसन काळे यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी ३ ) संजय उर्फ काल्या पंडीत काळे ४ ) मुस्तकिन शेख शबाना यांचे सोबत मिळुन उपरोक्त नमुद प्रमाणे दोन्ही गुन्हे केल्याची कबुली देवुन चोरीतील हिश्याला आलेला नगदी तीस हजार रुपये मुद्देमाल काढुन दिला . सदर आरोपीतांविरुध्द यापुर्वीचे अनेक चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे . सदरची कार्यवाही मा.श्री जी श्रीधर पोलीस अधीक्षक हिंगोली , श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक हिंगोली , पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री शिवसांब घेवारे , सपोनि श्री सुनिल गोपीनवार व पोलीस अमलदार गजानन पोकळे , संभाजी लकुळे , लिंबाजी वाहुळे , विठ्ठल काळे , ज्ञानेश्वर पायघन , जावेद शेख , प्रशांत वाघमारे स्था.गु.शा. हिंगोली तसेच सायबरसेल चे इरफान पठाण व रोहित मुदीराज यांनी केली आहे .









