फलटण / अमिर शेख
सांगली कोल्हापूर प्रमाणे फलटण फलटण तालुक्यात विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणार.
स्वाभिमानी विद्यार्थी परिषद प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तिच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार मग ती अडचण विद्यार्थ्याचे ऍडमिशनची असेल, बसची असेल एक ना अनेक प्रश्नांसाठी स्वाभिमानी विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळेपर्यंत लढत राहणार. अशी घोषणा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सौरभ राजू शेट्टी यांनी केली. आज फलटण मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृह येथे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या नेमणुका करण्यात आल्या. या निवडी वेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सौरभ राजू शेट्टी यांच्या उपस्थित स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या पुढील निवडी करण्यात आल्या . 1) यश प्रवीण वसव विद्यार्थी परिषद फलटण तालुका
2) रोहन वसंत चव्हाण
3) निखिल नाळे फलटण तालुका उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. निवडीवेळी सौरभ राजू शेट्टी अध्यक्ष विद्यार्थी परिषद , अमरसिंह कदम युवक प्रदेश अध्यक्ष,सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय मामुलकर, राज्य प्रवक्ते प्रमोद गाडे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, दादा जाधव पक्ष तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष सचिन खानविलकर उपस्थित होते









