बदनापूर
जालना औरंगाबाद हायवे रोड वर पिरसावंगी फाट्याजवळ राजशेठनी ढाबा येथे एका ६० वर्षीय इसमाचे जळालेल्या अवस्थेत मृत्यूदेह सकाळी आढळून आले असून सदर प्रेत या धाब्यावर रखवालदार म्हणून काम करणाऱ्या तुकाराम सखाराम शिंदे यांचे असून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे,सदर इसमाला जाळले किंवा तो स्वतः अकस्मातरीत्या जळाला अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे.
बदनापूर येथील र्हवाशी असलेले तुकाराम सखाराम शिंदे वय ६० वर्ष हे जालना औरंगाबाद रोड वर पिरसवंगी फाट्याजवळील राजस्थानी धाब्यावर रखवालदार म्हणू काम करीत होते ,१३ डिसेम्बर रोजी सकाळी धाब्यासमोर एका खुर्ची जवळ त्यांचा मृत्यूदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला ,कोणी तरी व्यक्तीचे जळालेले मृत्यूदेह पडलेले आहे अशी माहिती बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली असता त्यांनी घटनास्थळी भेट दिली व मृत्यूदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले.
मयत तुकाराम सखाराम शिंदे हे शेकोटी करून बसले असतील व ते पडले असतील त्यात शेकोटी मध्ये जाळून त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी म्याचे नातेवाईक रामेश्वर अर्जुन शिंदे यांनी पोलिसांना तक्रारी अर्ज देऊन माझ्या चुलत्यासोबत काही घातपात झाला किंवा कसे याची सखोल चौकशी कारवाई अशी मागणी अर्जात केली आहे








