फलटण / अमिर शेख
परम पूजनीय श्री माताजी निर्मालादेवी प्रणित सहजयोगया माध्यमातून, जगातील प्रत्येकाला भारतीय संस्कृती भुरळ टाकते,त्याच अनुषंगाने फलटण येथे अनंत मंगल कार्यालयात तब्बल सत्तर देशातील कलाकार येणार असून योगधारा संगीत,आत्मसाक्षात्कार व ध्यान धोरणेचा कार्यक्रम गुरुवार दि.16 रोजी आयोजित केला आहे.
दरम्यान या कार्यक्रमाला भारतासह,ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रीया,कॅनडा, चेक रिपब्लिक,फ्रान्स, जर्मनी,हंगेरी,इंडोनेशिया, इराण,इटली,रिपब्लिक ऑफ बेलारूम,रोमानिया,रशिया,स्लोवा रिपब्लिक,स्वीतझरलँड,तैवान,नेदरलँड, युनायटेड किंगडम, सह इतर विदेशातील अनेक कलाकार आपापली कला दाखविण्यासाठी येणार असून या कार्यक्रमात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
हा कार्यक्रम अनंत मंगल कार्यालय कोळकी ता.फलटण येथे गुरुवार दि.16 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









